महाराष्ट्र: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर फक्त दौरे नाही तर तातडीने मदत द्या- राजू शेट्टी
महाराष्ट्रातील विविध राज्यात गेल्या काही दिवासांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी पुर परिस्थिती सुद्धा निर्माण नागरिकांचे ही हाल झाले आहेत. याच कारणास्तव आता राज्यातील विविध पक्षातील नेतेमंडळी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जात तेथील परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभुमीवर माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत ते महाराष्ट्राला मदत करण्यासाठी दुजाभाव करत असल्याचे म्हटले. त्याचसोबत अतिवृष्टीमुळे फटका बसलेल्या भागात तातडीने एनडीएफची पथके पाठवण्यात यावी अशी मागणी सुद्धा राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.
सांगली येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राजू शेट्टी यांनी असे म्हटले आहे की, राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने त्यांना मदत करण्याची गरज आहे. याच कारणामुळे राज्य आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना 75 व 25 टक्के तातडीने मदत करावी अशी मागणी सुद्धा राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच राजू शेट्टी यांनी केंद्रासह राज्य सरकारवर सुद्धा निशाणा साधला.(महाराष्ट्र: अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी NCP अध्यक्ष शरद पवार घेणार पंतप्रधानांची भेट, केंद्राकडे करणार भरीव मदतीची मागणी)