महाराष्ट्रातून कॉंग्रेस हद्दपार? भाजप-शिवसेना तब्बल 43 जागांवर आघाडीवर, कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे फक्त 4 जागा (संपूर्ण यादी)
हे चित्र असेच राहिले तर या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातून कॉंग्रेस हद्दपार होणार असे दिसत आहे.
अखेर देशातील जनता ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होती तो दिवस उजाडला आहे. लोकसभा निवडणुकांचे निकाल (Lok Sabha Election Results 2019) हाती येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या दिसत असलेल्या चित्रानुसार भारतात परत एकदा मोदी राज येणार हे निश्चित झाले आहे. एक्झिट पोल बाहेर पडल्यावरच या गोष्टीचा अंदाज आला होता. मात्र 2004 वेळी जो चमत्कार झाला होता, अशा एखाद्या चमत्काराची कॉंग्रेसची आशा मावळली आहे. सध्याच्या निकालावरून राज्यात 48 पैकी तब्बल 43 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर कॉंग्रेस-राष्ट्रावादीकडे फक्त 4 जागा आहेत. हे चित्र असेच राहिले तर या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातून कॉंग्रेस हद्दपार होणार असे दिसत आहे.
पहा कोणत्या जागांवर कोणाची आघाडी
नागपूर - भाजप
रामटेक - भाजप
वर्धा - भाजप
भंडारा-गोंदिया - भाजप
गडचिरोली-चिमूर - भाजप
चंद्रपूर - कॉंग्रेस
(हेही वाचा: राजकारणाच्या रिंगणात Bollywood Stars ची प्रतिष्ठा पणाला; उर्मिलाला धक्का तर हेमा मालिनी आघाडीवर)
यवतमाळ-वाशीम - शिवसेना
बुलडाणा - शिवसेना
अकोला - भाजप
अमरावती - बहुजन वंचित आघाडी
हिंगोली - शिवसेना
नांदेड - भाजप
परभणी - शिवसेना
बीड - भाजप
उस्मानाबाद - शिवसेना
लातूर - भाजप
सोलापूर - भाजप
जळगाव - राष्ट्रवादी
रावेर - भाजप
जालना - भाजप
औरंगाबाद - AIMIM
रायगड - शिवसेना
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - शिवसेना
पुणे - भाजप
बारामती - राष्ट्रवादी
अहमदनगर - भाजप
माढा - भाजप
सांगली - भाजप
सातारा - राष्टवादी
कोल्हापूर - शिवसेना
हातकणंगले - शिवसेना
उत्तर मुंबई - भाजप
वायव्य मुंबई - शिवसेना
ईशान्य मुंबई - भाजप
उत्तर-मध्य मुंबई - भाजप
दक्षिण-मध्य मुंबई - शिवसेना
दक्षिण मुंबई - शिवसेना
ठाणे, कल्याण - शिवसेना
भिवंडी - भाजप
पालघर - शिवसेना
नंदूरबार - भाजप
दिंडोरी - भाजप
नाशिक - शिवसेना
धुळे - भाजप
मावळ - शिवसेना
शिरुर - राष्ट्रवादी
शिर्डी - शिवसेना