Maharashtra GDS Recruitment 2021: महाराष्ट्रात ब्रांच पोस्ट मास्टर ते डाक सेवक पदासाठी 2428 जागांवर होणार भरती; 26 मे पर्यंत appost.in वर असा करा ऑनलाईन अर्ज
ग्रामीण डाक सेवक आणि ब्रँच पोस्ट मॅनेजर या पदासाठी कोण, कधी, कसा अर्ज करू शकणार आहे? याची सविस्तर माहिती तुम्ही खाली पाहू शकता.
कोरोना संकटकाळात अनेकजण बेरोजगार झाले आहेत. सारीकडेच नकारात्मक वातारण असताना आता अनेक तरूणांसाठी भारतीय पोस्ट विभागानं (India Post) महाराष्ट्र सर्कलसाठी (Maharashtra Circle) भरती प्रक्रिया जाहीर केल्याने एक आशेचा किरण आहे. ग्रामीण डाक सेवक आणि ब्रँच पोस्ट मॅनेजर या पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. यामध्ये किमान 10वी पास उमेदवारांनाही संधी मिळणार असल्याने तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी दवडू नका. ग्रामीण डाक सेवक आणि ब्रँच पोस्ट मॅनेजर या पदासाठी कोण, कधी, कसा अर्ज करू शकणार आहे? याची सविस्तर माहिती तुम्ही खाली पाहू शकता.
ग्रामीण डाक सेवक आणि ब्रँच पोस्ट मॅनेजर या पदासाठी महत्त्वाची माहिती आणि तारीख
अर्ज कुठे कराल?
https://appost.in/gdsonline/
किती जागांसाठी नोकर भरती?
2428
अर्ज करण्याची अंतिम तारीख
26 मे 2021
अर्जाची फी
100 रूपये
पगार
ब्रांच पोस्ट मास्टर 12000 रुपये,
असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक यांना 10000 रुपये (4 तासाच्या सर्विससाठी) पगार असेल.
इथे पहा अधिकृत नोटिफिकेशन.
वयोमर्यादा आणि शुल्क
ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) आणि ग्रामीण डाक सेवक (GDS)या पदांवर होणार्या या भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे अआवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेमध्ये सूट असेल. एससी आणि एसटीसाठी 5 वर्षे तर ओबीसी प्रवर्गातील उमदेवारांसाठी 3 वर्ष वाढवून दिली जातील.
दरम्यान उमेदवाराचं शिक्षण किमान 10 वी असण्यासोबतच त्याला प्रादेशिक भाषेचं ज्ञान आणि सायकल चालवण्याचं ज्ञान आवश्यक आहे. ( नक्की वाचा: NHM Ratnagiri Recruitment 2021: आयुष मेडिकल ऑफिसर ते स्टाफ नर्स राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन अंतर्गत रत्नागिरी मध्ये 166 पदांवर होणार नोकरभरती; असा करा अर्ज).
पोस्ट विभागात या नोकरीच्या संधीसाठी उमेदवाराला ऑनलाईन अर्ज करून त्यामध्ये ऑनलाईन स्वरूपातच शुल्क भरण्याची संधी मिळणार आहे. ऑनलाईन अर्जांवरून मेरीट लिस्ट बनवून उमेदवार निवडले जाणार आहेत.