Maharashtra FYJC Admissions 2023: अकरावीची पहिली मेरीट लिस्ट आज होणार जाहीर; 11thadmission.org.in वर 'असा' पहा तुमचा प्रवेश कोणत्या कॉलेजमध्ये झाला!
यामध्ये वसई, भिवंडी, पनवेल या भागाचा देखील समावेश आहे.
शालेय शिक्षण विभागाकडून आज (21 जून) FYJC ची पहिली मेरीट लिस्ट आणि कट ऑफ जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या दहावीच्या मार्कांवरून कोणत्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळणार याची माहिती मिळणार आहे. 11thadmission.org.in या अधिकृत वेबसाईट वर त्याची माहिती दिली जाणार आहे. दरम्यान पहिल्या यादी मध्ये जे कॉलेज विद्यार्थ्यांना पसंतीक्रमातून दिले जाणार आहे ते पहिल्यांदा स्वीकारून प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
ज्युनियर कॉलेजची प्रवेश प्रक्रिया यंदा संपूर्णपणे ऑनलाईन केली जाणार आहे. मुंबई मेट्रोपोलिटन रिजन मध्ये 3.7 लाख विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. यामध्ये वसई, भिवंडी, पनवेल या भागाचा देखील समावेश आहे.
MAHARASHTRA FYJC FIRST MERIT LIST 2023 कशी पहाल?
- 11thadmission.org.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- ‘Merit List’चा पर्याय शोधून त्यामध्ये ‘FYJC First Merit List 2023’च्या लिंक वर क्लिक करा.
- नव्या पेज वर Arts, Science, किंवा Commerce शाखा निवडा. आता ओपन झालेल्या नव्या लॉगिन विंडो वर विचारण्यात आलेले तपशील टाका.
- अॅप्लिकेशन नंबर, रोल नंबर असे आवश्यक डिटेल्स टाकल्यानंतर सबमीट बटणावर क्लिक करा.
- FYJC First Merit List 2023 तुमच्या स्क्रिनवर दिसेल.
- डिटेल्स पाहून तुम्ही पेज डाऊनलोड करू शकाल. प्रिंट देखील काढून ठेवू शकता.
प्रवेशासाठी अर्ज करणार्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरण्याचा आणि त्यांच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती जोडून वेळेत आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. इयत्ता 11 वीच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली अनिवार्य कागदपत्रे 10वीची मूळ मार्कशीट आणि SSLC पास प्रमाणपत्र आहेत.