Maharashtra Electricity Workers Strike: वीज कर्मचारी संपावर, महाराष्ट्र अंधारण्याची शक्यता, उर्जामंत्र्यांसोबतची बैठक रद्द

त्यातच वीज कर्मचाऱ्यांनीही संपाची (Maharashtra Electricity Workers Strike) हाक दिली आहे. त्यामुळे आता राज्य आंधारातही जाण्याची शक्यता वाढली आहे.

Electricity Bill | Representational Image (Photo Credits: Pixabay)

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आगोदरच कोलमडली आहे. त्यातच वीज कर्मचाऱ्यांनीही संपाची (Maharashtra Electricity Workers Strike) हाक दिली आहे. त्यामुळे आता राज्य आंधारातही जाण्याची शक्यता वाढली आहे. विविध मागण्यांसाठी राज्य वीज कर्मचारी संपावर आहेत. विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्यासमोरील वीजटंचाईचा संभाव्य धोका विचारात घेऊन राज्य सरकारनेही कर्मचाऱ्यांशी बोलणी सुरु ठेवली आहेत. याचाच भाग म्हणून उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) आणि वीज कर्मचारी यांच्या कालच एक बैठक पार पडली. परंतू ती निष्फळ ठरली. आजची बैठकही रद्द झाली आहे.

वीज कर्मचाऱ्यांच्या संपावर निर्बंध आणण्यासाठी राज्य सरकारने 'मेस्मा' कायदा लागू करण्याचा विचार सुरु केला आहे. दरम्यान, पुढचे आणखी काही काळ हा संप कायम राहिला तर वीजटंचाईचे हे संकट शहरी भागातही उतरण्याची शक्यता आहे. तसे घडले तर अवघे राज्यच अंधारात जाऊ शकते. (हेही वाचा, Electricity Safety Tips: वीज गेली असल्यास काय करावे अथवा करु नये, जाणून घ्या सविस्तर)

महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण कंपन्यांत सुरू करण्यात येत असलेले खाजगीकरणास विरोध हा या संपातील पहिला मुद्दा आहे. केंद्र सरकारच्या विद्युत (संशोधन) बिल 2021 खाजगीकरण धोरणालाही कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. याशिवाय तिन्ही वीज कंपन्यांत 30 हजार कंत्राटी आणि बाहयस्त्रोत कामगार यांना वयाच्या साठ वर्षापर्यंत नोकरीत संरक्षण प्रदान करण्यात यावी अशी प्रमुख मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. शिवाय महानिर्मिती कंपनी संचलित करीत असलेले जलविद्युत केंद्र खाजगी उद्योजकांना देण्याचे धोरण त्वरित थांबवावे. तिन्ही कंपन्यातील रिक्त असलेली पदे तातडीने भरण्यात यावी, कर्मचारी अभियंते व अधिका-यांच्या बदली धोरणावर एकतर्फी निर्णया विरुद्ध कर्मचारी एक झाले आहेत.

महत्त्वाचे म्हणजे वीज निर्मीती आणि कोळसा पुरवठा करणाऱ्या प्रमुख केंद्रांवरील कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे. त्यामुळे राज्या वीजेचा तुटवडा भासू शकतो. या संपाचा परिणाम आता जाणवू लागला आहे. कोयना धरणाचं पायथा विद्युतगृह सध्या बंद झालं आहे. त्यामुळे राज्यात विजेचा तुटवडा अधिक भासू शकतो.