महाराष्ट्र राज्यात 1 एप्रिल पासून वीज दरात मोठी कपात; शेती, व्यावसायिक व घरगुती ग्राहकांना दिलासा
वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती विजेच्या वापरात 5-7 टक्के, व्यावसायिक दरात 10-12 टक्के आणि औद्योगिक दरात 10-11 टक्क्यांनी कपात करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या नव्या नियमानुसार 1 एप्रिल पासून वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती विजेच्या वापरात 5-7 टक्के, व्यावसायिक दरात 10-12 टक्के आणि औद्योगिक दरात 10-11 टक्क्यांनी कपात करण्यात येणार आहे. मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र या प्रमाणे वीज दरात कपात करण्यात येणार आहे. मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या आयोगाच्या आदेशानुसार दर कमी करण्यात येतील, तर उर्वरित महाराष्ट्रासाठी दर महावितरणकडून कमी केले जातील, असेही सांगण्यात आले आहे. हे कमी केलेले दर सविस्तर जाणून घ्या..
प्राप्त माहितीनुसार, मुंबई वगळता महाराष्ट्र राज्यात घरगुती वीज दरात 5 टक्के, व्यावसायिक वीज दरात 10-11 टक्के, उद्योगाच्या वीज दरात 11-12 टक्के तर शेतीच्या वीज दरात 1 टक्के कपात करण्यात येणार आहे. यापैकी बेस्टकडून घरगुती वीज दरात दीड ते दोन टक्के, उद्योगी वीज दरात 7 टक्के, व्यावसायिक वीज दरात 8 टक्के कपात करण्यात येणार आहे, तर टाटा-अदानी (TATA- Adani) यांच्याकडून घरगुती आणि व्यावसायिक वीज दरात 11 टक्के तर उद्योगासाठी वीज दरात 10 ते 11 टक्के कपात केली जाईल . रात्रीच्या तुलनेत दिवसा वीजेचे दर स्वस्त होणार; केंद्र सरकार वीज दराबाबत नवी नियमावली आणण्याच्या तयारीत
दरम्यान, राज्य सरकारने लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पुढील तीन महिने उद्योजकांकडून वीज बिल वसुली केली जाणार नाही अशीही घोषणा केली आहे.यामुळे सरकारी तिजोरीवर परिणाम होऊ शकतो. त्यात आता ही कपात देखील अधिक भार वाढवू शकते असे दिसून येतेय मात्र राज्य सरकारच्या तिजोरीवर अधिक भर न येता वीज बिलाच्या दरात मोठी कपात केली जाणार आहे, अशी माहिती आनंद कुलकर्णी यांनी दिली आहे.