Maharashtra Elections 2024: विधानसभा मतदानाच्या दिवशी मुंबईत मेट्रो आणि बेस्ट सेवा मध्यरात्रीपर्यंत सुरु राहणार; मतदार आणि सामान्य प्रवाशांना होणार फायदा

म्हणजे 20 नोव्हेंबर 2024 रोजी वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.

BEST Bus (File Image)

Maharashtra Elections 2024: निवडणूक कर्मचाऱ्यांना (Election Staff) त्यांच्या गंतव्यस्थानी वेळेवर पोहोचता यावे आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका सुरळीत पार पाडता याव्यात, यासाठी मुंबईतील मेट्रो आणि बेस्ट बस सेवेसह सार्वजनिक वाहतूक सेवा मतदानाच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. मतदान बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. आयोगाने यापूर्वीच मुंबईत मतदानाच्या दिवशी अनिवार्य सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि मुंबईचे मुख्य निवडणूक अधिकारी, भूषण गगराणी यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी मतदानाच्या दिवशी सार्वजनिक वाहतुकीच्या वेळा वाढवण्याची विनंती केल्यानंतर हे निर्देश जारी करण्यात आले.

गगराणी यांनीएमएमआरसीएल (MMRCL), रिलायन्स मेट्रो आणि बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) यांना त्यांच्या सार्वजनिक वाहतूक सेवा मतदानाच्या दिवशी. म्हणजे 20 नोव्हेंबर 2024 रोजी वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार विस्तारित वाहतूक सेवा 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 4:00 वाजता सुरू होतील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 1:00 पर्यंत सुरू राहतील, असे निवडणूक आयोगानेने प्रसिद्ध केलेल्या प्रेस स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.

या निर्णयाचा उद्देश, ज्या कर्मचाऱ्यांना मतदानाची कर्तव्ये पार पाडण्यासाठी मतदान केंद्रांवर लवकर अहवाल देणे आवश्यक आहे, त्यांनी वेळेवर पोहोचणे आणि उपस्थिती सुलभ करणे हे आहे. विस्तारित कामकाजाच्या तासांमुळे मतदार आणि सामान्य प्रवाशांनाही फायदा होईल. दिवसभर संपूर्ण शहरात विनाअडथळा प्रवास सुनिश्चित होईल, ज्यामुळे मतदारांची संख्या वाढेल. नागरिक आणि निवडणूक कर्मचाऱ्यांनी त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे आणि या विस्तारित सार्वजनिक वाहतूक सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. (हेही वाचा: Maharashtra Assembly Elections 2024: मुंबई शहर जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी विशेष सुविधा; जाणून घ्या कुठे नोंदवू शकाल तुमच्या मागण्या)

यासह दिव्यांग आणि 85+ नागरिक त्यांच्यासाठी व्यवस्था केलेल्या एसी बसेसच्या निम्न-मजल्यावरील डेकचा लाभ घेऊ शकतात, असे आयोगाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, आयोगाने याआधीच व्यावसायिक आस्थापना आणि व्यापाऱ्यांसह सर्व सरकारी आणि खाजगी क्षेत्रांसाठी अनिवार्य सार्वजनिक सुट्टीचे निर्देश दिले आहेत. नागरिकांना त्यांचे मतदान करता यावे हा यामागचा उद्देश आहे. सशुल्क सुट्टी मंजूर न केल्यास, भारत निवडणूक आयोगाकडून संबंधित कलमांनुसार कठोर कारवाई केली जाईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif