Maharashtra Election Result 2024: महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये नेमकं कोण? पहा शिवसेना, भाजपा, एनसीपी, उबाठा(शिवसेना), एसपी (राष्ट्रवादी कॉंग्रेस) आणि कॉंग्रेसने किती जागा लढवल्या?
त्यामुळे वाढलेला मतदानाचा टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार याचं उत्तर आता 23 नोव्हेंबरला मिळणार आहे.
महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूकीचं (Maharashtra Election) मतदान पार पडलं आहे. आता या निवडणूकीच्या निकालाचे वेध लागले आहेत. 288 जागांसाठी 6 प्रमुख पक्षांमध्ये लढाई होणार आहे. महाविकास आघाडी (Maha Vikaas Aghadi) विरूद्ध महायुती (Mahayuti) या लढाई सोबतच या निवडणूक मनसे काय भूमिका बजावणार याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. 20 नोव्हेंबरला झालेल्या मतदानामध्ये सुमारे 66% इतके विक्रमी मतदान नोंदवले गेले आहे. त्यामुळे वाढलेला मतदानाचा टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार याचं उत्तर आता 23 नोव्हेंबरला मिळणार आहे. 2019 च्या निवडणूकीमध्ये मतदारांनी भाजपा-शिवसेना युतीच्या बाजूने कौल दिला होता पण पुढे मुख्यमंत्रीपदावरून त्यांच्यात धुसफूस झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात अभुतपूर्व घटना घडल्या आणि महाविकास आघाडीचा जन्म झाला. यंदा मतदाराचा कौल कुणाच्या बाजूने जाणार? हे जाणून घेण्यापूर्वी पहा नेमकं महायुती मध्ये कोण आहे आणि महाविकास आघाडीत कोण आहे?
महाविकास आघाडी कोणाची?
2019 च्या विधानसभा निकालानंतर राज्यात सत्तेची घडी बसवण्यासाठी महाविकास आघाडी चा जन्म झाला. प्रामुख्याने महाविकास आघाडीत शिवसेना, एनसीपी आणि कॉंग्रेस या पक्षांचा समावेश होता पण दीड-दोन वर्षातच त्यामध्येही शिवसेना आणि एनसीपी पक्ष फुटले त्यामुळे आता महाविकास आघाडी मध्ये उबाठा शिवसेना, कॉंग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस या प्रमुख पक्षांचा समावेश आहे. त्याच्या सोबत भाकप, सपा आणि शेतकारी कामगार पक्ष यांचा समावेश आहे.
मविआ चे विधानसभा निवडणूकीतील उमेदवार किती?
कॉंग्रेस - 103
उबाठा शिवसेना - 92
शरदचंद्र पवार एनसीपी - 81
सपा - 1
शेकाप- 1
माकप- 1
सोलापूर दक्षिण मध्ये कॉंग्रेस आणि उबाठा चा उमेदवार आहे.
महायुती
शिवसेना आणि एनसीपी मध्ये फूट पडल्यानंतर भाजपा सोबत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्त्वामध्ये एनसीपी यांची मिळून महायुती झाली आहे. सोबतच महायुती मध्येही काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. यामध्ये अणुशक्तीनगर मध्ये नवाब मलिक आहेत. तर महायुतीने शिवडी मध्येही बाळा नांदगावकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
महायुतीचे विधानसभा निवडणूकीतील उमेदवार किती?
भाजपा- 149
शिवसेना- 81
एनसीपी- 53
राष्ट्रीय समाज पक्ष- 1
रा.स.वा.-1
JSS-2
RYSP-1
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. उद्या 23 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. त्यानंतर निकाल हाती येईल. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर दिवशी संपणार आहे.