Jalna Rape: जालन्यात एका वृद्ध व्यक्तीकडून 12 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक
देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना घडत आहेत. यातच महाराष्ट्राच्या (Maharashtra) जालना जिल्ह्यात (Jalna District) एका वृद्ध व्यक्तीने 12 वर्षाच्या मुलीवर (Minor Girl) बलात्कार केल्याची घटना समोर येत आहे.
देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराचे (Rape) सत्र सुरुच आहे. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना घडत आहेत. यातच महाराष्ट्राच्या (Maharashtra) जालना जिल्ह्यात (Jalna District) एका वृद्ध व्यक्तीने 12 वर्षाच्या मुलीवर (Minor Girl) बलात्कार केल्याची घटना समोर येत आहे. ही घटना मंगळवारी घडली आहे. याप्रकरणी एका 65 व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्याविरोधात पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा जालना जिल्ह्याच्या एका गावातील रहिवाशी आहे. आरोपीला पाच मुले आणि नातवंडे आहेत. तसेच या गावात राहत असलेल्या मामाच्या येथे पीडित मुलगी राहायला आली होती. दरम्यान, बुधवारी त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या आरोपीने तिला जबरदस्तीने घरात घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपीने गावातून पळून गेला. दरम्यान, आपल्यासोबत घडलेल्या सर्व प्रकार पीडित मुलीने तिच्या मामाला सांगितल्यानंतर त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर 65 वर्षीय आरोपीला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. हे देखील वाचा- BARC Scientist Dies By Suicide: बीएआरसी शास्त्रज्ञाची गळफास लावून आत्महत्या, कारण अस्पष्ट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्याविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.