Deputy CM Ajit Pawar यांनी पत्नी सुनेत्रा पवारांसोबत केली Dagdusheth Halwai Ganpati ची पूजा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुमित्रा पवारांसोबत पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा केली.
Deputy CM Ajit Pawar Visit Dagdusheth Halwai Ganpati: आज अनंत चतुर्थीनिमित्त देशभरात बाप्पाचा जयजयकार करत आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला जातोय. सर्वच राजकीय नेते गणरायाच्या आर्शिवादासाठी विविध मिडळांच्या गणपतींपुढे नतमस्तक होत आहेत. कालच अजित पवार यांनी लालबागच्या राजा (Lalbaghcha Raja) चे दर्शन घेतले होते. आज अनंत चतुर्थी असल्याकारणाने देशभरातील सर्व गणेश मूर्तींचे विसर्जण होईल. (हेही वाचा: DCM Ajit Pawar Visit Lalbaghcha Raja: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन)
गणपतीपुढे नतमस्तक
त्यानंतर अजित पवारांनी माझगावच्या अंजिरवाडी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळालाही भेट दिली. सोबतच, अजित पवार यांनी सिद्धिविनायक मंदिरात पूजाही केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्र्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं.