Maharashtra: ठाण्यातील 'त्या' 5 कोरोनाबाधितांचा मृत्यू ऑक्सिजन अभावी नव्हेतर 'या' कारणांमुळे झाला, महत्वाची माहिती समोर
ऑक्सिजन अभावी या रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केले होते.
ठाण्यातील (Thane) वर्तकनगर (Vartak Nagar) येथील वेदांत रुग्णालयात (Vedant Hospital) गेल्या आठवड्यात 5 करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली होती. ऑक्सिजन अभावी या रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केले होते. मात्र, रुग्णालयाने हे आरोप फेटाळले होते. या रुग्णांच्या मृत्युनंतर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकाचे (Bhiwandi-Nizampura Municipal Corporation) आयुक्त डॉ. पंकज आशिया (Pankaj Ashiya) यांच्या अध्यक्षतेखालील समितीची सखोल चौकशी करण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसार या रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन अभावी नव्हेतर, इतर कारणांमुळे झाला आहे, अशी माहिती समोर आली आहे.
ठाण्यातील वर्तकनगर येथील वेदांत रुग्णालयात 26 एप्रिल रोजी 5 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. ऑक्सिजन आभावीच या रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचे नातेवाईक आणि इतर लोक करत होते. या रुग्णांच्या मृत्युंचा तपास करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली होती. दरम्यान, समितीने रुग्णांचे निदान आणि त्यांच्या उपचारांशी संबंधित संबंधित कागदपत्रांची तपासणी केली. याचबरोबर मृतांचे नातेवाईक, डॉक्टर, परिचारिका, आणि पुरवठा व्यवस्थापित करणारे कर्मचारी आणि आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या इतर रूग्णांची चौकशी केली. त्यानुसार, या रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन अभावी नव्हेतर, निमोनियामुळे आणि त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे झाला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. हे देखील वाचा- Covid-19 Vaccination in Pune: राज्य सरकारकडून मर्यादीत लस पुरवठा; Vaccines च्या कमतरतेमुळे लसीकरण केंद्र तात्पुरती बंद- महापौर मुरलीधर मोहोळ
या प्रकरणी राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयास भेट देऊन प्रकरणाची चौकशी करण्यासाठी भिवंडीचे आयुक्त डॉ. पंकज अशिया यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांच्या समितीची नियुक्ती केली होती. या समितीकडून या प्रकरणाची चौकशी करून प्रकरणाचा सविस्तर अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहे.