Maharashtra Day 2022 Wishes in Marathi: महाराष्ट्र दिनाच्या मराठी शुभेच्छा देण्यासाठी Wishes, Messages, Images, Wallpapers शेअर करून साजरा करा महाराष्ट्र दिन

Happy Maharashtra Din Wishes in Marathi: महाराष्ट्र दिन (Maharashtra Day 2022) म्हणजे अवघ्या मराठी मनाच्या आनंदाचा दिवस. 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र (Maharashtra) हे स्वतंत्र राज्य अस्तित्वास आले. तेव्हा पासून याच दिवशी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. विशेष म्हणजे याच दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन सुद्धा साजरा होतो.

Happy Maharashtra Din Wishes in Marathi: दिन (Maharashtra Day 2022) म्हणजे अवघ्या मराठी मनाच्या आनंदाचा दिवस. 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र (Maharashtra) हे स्वतंत्र राज्य अस्तित्वास आले. तेव्हा पासून याच दिवशी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. विशेष म्हणजे याच दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन सुद्धा साजरा होतो. महाराष्ट्राला कामगाल लढ्याचीही मोठी परंपरा लाभली आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन असा दुहेरी आनंद एकाच दिवशी साजरा होतो. महाराष्ट्र दिन निमित्त आपल्या शुभेच्छा आपण Maharashtra Day Wishes, Messages, HD Wallpapers, GIFs, Whatsapp Status, Facebook Images च्या माध्यमातून शेअर करू शकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आपला संदेश समोरच्यापर्यंत पोहोचवू शकता.  Happy Maharashtra Day Quotes: गोविंदाग्रज ते रामदास स्वामी यांच्या शब्दांत महाराष्ट्राची महती पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रं, ग्रिटिंग्स !

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवारहलाल नेहरु आणि सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली भारताची भाषावर प्रांतरचना झाली. यात महाराष्ट्र हे राज्य अस्तित्वास आले. मुंबई महाराष्ट्राची की गुजरातची यावरुन प्रचंड संघर्ष झाला. दिल्लीतील कारस्थानी नेत्यांचा डाव हाणून पाडत मुंबईसह मराहाष्ट्र निर्मिती करण्यास मराठी मनाला यश आले. त्यासाठी सुमारे 105 मराठी बांधव हुतात्मे झाले. या सगळ्यांची स्मृती म्हणून महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.

महाराष्ट्र कामगार दिन महाराष्ट्र आणि भारतासह जगभरातील मराठी बांधव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या दिवशी सरकारी आणि खासगी कंपन्या, उद्योगांना सुट्टी असते. योगायोग असा की याच दिवशी जागतिक कामगार दिनसुद्धा असतो. तसेच युरोपमध्ये मपेल नावाचा काठी उत्सवही साजरा केला जातो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी महाराष्ट्र निर्मितीत विरमरण आलेल्या 105 हुतात्म्यांचे स्मरण केले जाते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement