ThopTV App निर्माता Satish Venkateshwarlu यास महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून अटक, ओटीटी प्लॅटफॉर्मवरील पायरेटेड कंटेंट व्हायचा अॅपवर उपलब्ध

महाराष्ट्र सायबर पोलिसांनी नुकतीच हैदराबाद (Hyderabad) स्थित एका आयटी अभियंत्यास अटक केली आहे. सतिश वेंकटेशवारलू (Satish Venkateshwarlu) असे या अभियंत्याचे नाव आहे

Cyber Police | Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र सायबर पोलीस (Maharashtra Cyber Police) जोरदार कार्यरत झाले आहेत. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी नुकतीच हैदराबाद (Hyderabad) स्थित एका आयटी अभियंत्यास अटक केली आहे. सतिश वेंकटेशवारलू (Satish Venkateshwarlu) असे या अभियंत्याचे नाव आहे. हा अभियंता थोप टीव्ही (Thop TV) नावाचे एक मोबाईल अॅप चालवत असे. या थोप टीव्ही अॅपच्या माध्यमातून तो ओव्हर द टॉप म्हणजेच ओटीटी प्लॅटफॉर्मवरील (OTT Platforms ) पायरेटेड कंटेंट (Pirated Content) उपलब्ध करुन देत असे असा त्याच्यावर आरोप आहे. दरम्यान, सतीश वेंकटेशवारलू यास अटक केल्यानंतर काहीच वेळात Thop TV App चा सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र सायबर पोलीसांनी सतिश वेंकटेशवारलू यास तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद येथून अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतिश वेंकटेशवारलू या 28 वर्षीय अभियंता पाठीमागील दोन वर्षांपासून “Thop TV” नावाचे मोबाईल अॅप चालवतो. या अॅपचे लाखो दर्शक आहेत. यात 5,000 बोगस सब्सक्रायबर्सचाही समावेश आहे. (हेही वाचा, Shabana Azmi: शबाना आजमी यांच्या ऑनलाईन फसवणूक प्रकरणाचा 26 IITians द्वारा तपास)

मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असलेल्या वायकॉम 18 मीडिया प्रा. लि. ( Viacom 18 Media Private Limited) या मोठ्या कंपनीसह याच क्षेत्रातील इतरही अनेक महत्त्वाच्या प्रसारण समुहांनी महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीत आरोप होता की नकली आणि स्वतंत्र अशा एका अॅपवरुन त्यांचा कंटेट चोरला जातो आहे. तसेच, मूळ कंटेंटमध्ये काही बदल करत तो वितरीतही केला जातो आहे. प्राप्त तक्रारीवरुन, गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास करत संबंधित अभियंत्यास अटक केली. पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, थोप टीव्ही नामक अॅपसाठी नोंदणी शूल्क नाममात्र होते. अवघ्या 35 रुपयांना या अॅपची नोंदणी मिळायची. तसेच, हे अॅप सोशल मीडियाच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवले जायचे.

तक्रारदार असलेल्या माध्यम करमणूक संस्थांनी तक्रारीत दावा केला होता की अॅपमुळे त्यांच्या उत्पन्नाला बाधा आली आहे. प्राप्त तक्ररीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 ( Information Technology Act) कलम, 63, 66B आणि B 66 बी, कॉपीराइट कायदा (Copyright Act) कलम 63 तसेच भारतीय दंड संहिता कलम 420 आणि 34 अन्वये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.