Maharashtra Coronavirus Updates: महाराष्ट्रात 562 जण नव्याने कोरोना व्हायरस संक्रमीत, तिघांचा मत्यू; राज्यभरात 3,488 सक्रीय रुग्ण
काल (2 एप्रिल) 562 जण नव्याने कोरोना संक्रमित आढळले. तर कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, 395 जणांना उपचार घेऊन बरे वाटल्याने डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळालेल्या नागरिकांची संख्या 79,93,410 इतकी झाली आहे. रुग्णांचे बरे होण्याचे सरासरी प्रमाणही 98.13% इतके असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
Maharashtra COVID-19 Updates: महाराष्ट्रातील कोरोना संक्रमितांची (Maharashtra Coronavirus Updates) संख्या दिवसेंदविस पुन्हा एकदा वाढू लागली आहे. राज्यातील नव्याने कोरना (Coronavirus) संक्रमित आणि झालेल्या मृत्यूंसह आरोग्य विभागाने राज्यातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या दिली आहे. हाती आलेल्या शेवटच्या अद्ययावत माहितनुसार राज्यात सक्रीय रुग्णांची संख्या 3,488 इतकी झाली आहे. काल (2 एप्रिल) 562 जण नव्याने कोरोना संक्रमित आढळले. तर कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, 395 जणांना उपचार घेऊन बरे वाटल्याने डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळालेल्या नागरिकांची संख्या 79,93,410 इतकी झाली आहे. रुग्णांचे बरे होण्याचे सरासरी प्रमाणही 98.13% इतके असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
राज्यात काल तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 1.82% इतके आहे. कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे विचारात घेता, आंतरराष्ट्रीय प्रवास करुन महाराष्ट्रत दाखल होणाऱ्या प्रवाशांचे स्क्रिनिंग केले जात आहे. प्रामुख्यने मुंबई, पुणे, नागपूर विमानतळावर विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रात काल एकूण 16,63,026 प्रवासी दाखल झाले. त्यापैकी 37,045 जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यातून 45 जण कोरोणा संक्रमीत आढळले. (हेही वाचा, COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 3,824 नवे रूग्ण; कालच्या तुलनेत 27% पेक्षा अधिक रूग्ण)
दरम्यान, महाराष्ट्रातील विमानतळांवर करण्यात आलेल्या एकूण आरटीपीसीआर चाचण्यांपैकी संक्रमित आढळलेल्या रुग्णांपैकी 10 रुग्ण पुणे, 8 मुंबई, तर नवी मुंबई, अमरावती, सांगली, औरंगाबाद आणि सातारा येथून प्रत्येकी एक जण संक्रमित आढलला. तर पाच जण गुजरात, चार उत्तर प्रदेश, तीन केरळ, तामिळनाडू, राजस्थान येथून प्रत्येकी दोन तर गोवा आणि असम येथून एक प्रवासी संक्रमित आढळला.
ट्विट
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, राज्यभरातील कोरना संक्रमितांची सक्रीय रुग्णसंख्या 3,448 इतकी आहे.