Maharashtra Corona: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांच्या आकडेवारीत 14 फेब्रुवारीला सर्वाधिक वाढ

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

राज्यात कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच देशासह आता विविध राज्यातील जिल्ह्यात लसीकरण मोहिम सुद्धा सुरु केली गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये सुद्धा घट झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच मुंबईत लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. परंतु रविवारी (14 फेब्रुवारी) कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून आले आहे.(Maharashtra Weather Forecast: विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात 16-18 फेब्रुवारी दरम्यान वीजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता)

रविवारी मुंबईत नवे 645 रुग्ण आढळलन आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 314076 वर पोहचला आहे. त्याचसोबत एकूण 11419 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढू नये म्हणून प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत, तसेच नागरिकांना सुद्धा नियमांचे पालन करावे असे सांगितले जात आहे.(Coronavirus Outbreak in Amravati: अमरावती जिल्ह्यात पुन्हा जमावबंदी, कोरोना व्हायरस प्रादुर्भाव वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश)

दरम्यान, मुंबईत सध्या 5068 रुग्णांवर उपचार सुरु असून 1141 नव्या रुग्णांची सुद्धा नोंद करण्यात आली आहे. तर 31 लोकांचा मृत्यू मुंबई मंडळात झाला आहे. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा 704561 वर पोहचला आहे. तसेच आतापर्यंत 19685 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. मुंबई मंडळामध्ये मुंबई शहरासह उपनगराचा समावेश आहे. तर मुंबई शहरातही कोरोना व्हायरस संक्रमितांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. परंतू, लॉकडाऊन शिथिलता दिल्यानंतर दळणवळण मोठ्या प्रमाणावर वाढले. नागरिकांनी प्रवास करणे सुरु केले. परिणामी कोरोनाची संख्या पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याचे पाहायला मिळत आहे.