शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचं महत्त्वाचं विधान
भाजप ही निवडणूक युतीद्वारे लढला. परंतू, त्यांना मित्रपक्षांना सांभाळून घेता येत नाही, हेच यातून सिद्ध होत असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.
शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस पक्षाचे (Congress) अद्याप काहीही ठरल नाही. शिसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याबातही कोणत्याही काँग्रेस नेत्याने वक्तव्य केले नाही. जर ते कोणी केले असेल तर त्या नेत्याचे ते व्यक्तिगत मत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Maharashtra Congress President बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची एक बैठक आज (1 नोव्हेंबर 2019) राजधानी दिल्ली येथे पार पडली. या बैठकीनंतर थोरात हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
थोरात यांनी या वेळी बोलताना सांगितले की, राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी विलंब लागणे हे भाजपचे अपयश आहे. भाजप ही निवडणूक युतीद्वारे लढला. परंतू, त्यांना मित्रपक्षांना सांभाळून घेता येत नाही, हेच यातून सिद्ध होत असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली. (हेही वाचा, नाशिक: पिकाची नुकसान पाहण्यासाठी शरद पवार पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर)
दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनीही सांगितले की, शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत अद्याप काही ठरले नाही. मात्र, काँग्रेस सध्या 'वेट अॅण्ड वॉच' भूमिकेत आहे. महाराष्ट्रात सध्या ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत त्यावर काँग्रेस बारकाईने लक्ष ठेऊन असल्याचेही अशोक चव्हाण म्हणाले.