Maha Vikas Aghadi Sarkar Live Updates: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली लता मंगेशकर यांची भेट; केली तब्यतेची चौकशी

महाविकासआघाडी सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. आज (शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019) या सरकारचा पहिलाच दिवस असून, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून दुपारी एक वाजता पदभार स्वीकारणार आहेत. या पदभारासोबत राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठीसोबत जोडलेले राहा.

30 Nov, 01:57 (IST)

गेल्या काही दिवसांपासून लता मंगेशकर यांची तब्येत थोडी नाजूक आहे. सध्या त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे. अशात उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात लता मंगेशकर यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. 

30 Nov, 24:49 (IST)

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज एक मोठा निर्णय घेत आरे कार शेडच्या कामाला स्थगिती दिली. या निर्णयावर भाजपच्या नेत्यांनी टीका केली आहे. आरेबाबत घेतलेला निर्णय हा घृणास्पद असल्याचे मत आशिष शेलार यांनी व्यक्त केले आहे. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, 'मा. सर्वोच्च न्यायालय आणि मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कार शेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी आहे', असा हल्लाबोल केला आहे.

 "धनुष्यबाणा"च्या "हातात" "घड्याळ" बांधले जाते तेव्हा, विकासाचे काटे आणि चक्र उलटीच फिरणार!

30 Nov, 24:16 (IST)

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) आमदार दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) हे महाराष्ट्र विधानसभेचे नवे हंगामी अध्यक्ष (Pro-Tem Speaker) असणार आहेत. यापूर्वी भाजपचे आमदार कालिदास कोलंबकर यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. दिलीप वळसे पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे एक नावाजलेले नाव आहे, तसेच ते राज्य विधानसभेचे सभापती देखील राहिले आहेत. स्पीकर व्यतिरिक्त ते राज्यातील ऊर्जा, अर्थ आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री देखील राहिले आहेत.

29 Nov, 23:37 (IST)

उद्धव ठाकरे यांनी काल महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता चर्चा आहे ती उपमुख्यमंत्री कोण होणार याची. मात्र tv 9 मराठीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाळासाहेब थोरात हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. 

29 Nov, 22:46 (IST)

उद्धव ठाकरे यांनी काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आजपासून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्यावर आज त्यांनी महत्वाची घोषणा केली ती आरे कारशेडबाबत. आरे कारशेडच्या कामाला उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे. आरेबाबतची संपूर्ण चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या कामाला सुरुवात होणार नाही असे त्यांनी सांगितले.

29 Nov, 22:37 (IST)

मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन पदभार स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे हे मंत्रालयातून पत्रकार परिषद घेत आहेत. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे दिलखूलासपणे चर्चा केली.

29 Nov, 20:39 (IST)

महाविकास आघाडी सरकारचा विधानसभा अध्यक्ष अद्याप ठरला नाही. मात्र, महाआघाडीच्या सत्तावाटपात अध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आल्याचे वृत्त आहे. त्यानुसार दिलीप वळसे पाटील हे नवे हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहाणार आहेत. त्यांच्या नावाची नुकतीच घोषणा करण्यात आली.

29 Nov, 19:44 (IST)

आतापर्यंत 'मातोश्री' या आपल्या निवासस्थानावरुन सत्तेचा रिमोट चालवणारे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर पहिल्यांदाच मंत्रालयात दाखल होत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला.  मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर असलेल्या आपल्या दालनात उद्धव ठाकरे दुपारी दोन वाजता पोहोचले. इथे त्यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला.

दरम्यान, एकनाथ शिंदे,  जयंत पाटील, बाळासाहेब थोरात हेदेखील मंत्रालयात दाखल झाले.

एएनआय ट्विट

29 Nov, 19:22 (IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयात दाखल झाले आहेत. अवघ्या काही मिनिटांमध्येच ठाकरे हे मुखमंत्री म्हणून आपल्या पदाचा पदभार स्वीकारत आहेत. मंत्रालयाती अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे.

29 Nov, 19:14 (IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही वेळातच मंत्रालयात दाखल होतील. इथे ते मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबई येथील हुतात्मा चौकात जाऊन हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींचे दर्शन घेतले. हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. त्यानंतर ठाकरे यांचा ताफा मंत्रालयाकडे रवाना झाला.

29 Nov, 18:58 (IST)

थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोहचणार मंंत्रालयात पोहाचणार आहे. आज ते मंत्रालयात पदभार स्वीकारणार आहेत. मुख्यमंत्री पदाची काल शिवाजी पार्कवर शपथ घेतल्यानंतर आज ते मंत्रालयात पोहचणार आहेत. 

29 Nov, 18:22 (IST)

महाविकासआघाडीत पदवरुन कोणताही वाद नाही. त्यात उपमुख्यमंत्री पदावरुन वाद असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री पदाबबत कोणताही वाद नाही. मात्र, अध्यक्ष पदाबाबत निर्णय घेणे अद्याप बाकी आहे, असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

29 Nov, 18:11 (IST)

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमत्री पदाचा पदभार आज स्वीकारणार आहेत. काही वेळातच ते मंत्रालयात दाखल होणार आहेत. तसेच, मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारून ते आसन ग्रहण करतील. पदभार स्वीकारल्यापानंतर खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांच्या कामगाजास ते सुरुवात करतील.

29 Nov, 16:49 (IST)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर वर्षा बंगला खाली करण्याचा निर्णय घेतला असून, बंगल्यावर सामानाची बांधाबांधही सुरु केली आहे.

 

29 Nov, 16:36 (IST)

राज्यात मुख्यमंत्री आणि सरकारचा शपथविधी झाल्यानंतर पार पडलेल्या पहिलेल्या पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांऐवजी बहुमतावर चर्चा का झाली? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.

देवेंद्र फडणवी ट्विट

29 Nov, 16:13 (IST)

महाराष्ट्रातील राजकीय घडी ठिक बसली आता आमचे लक्ष गोवा राज्याकडे आहे. गोव्याचे नेते ढवळीकर आपल्या सर्व आमदारांसह आमच्या संपर्कात आहेत. ज्या ज्या ठिकाणी अनैतिक मार्गाने भाजप सत्तेवर आले आहे त्या त्या ठिकाणी आम्ही भाजप विरोधी फ्रंड तयार करु, असे भाकीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

29 Nov, 15:59 (IST)

मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आजच पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. दरम्यान, वत्त आहे की, शेतकरी केंद्रस्थानी ठेऊन सत्तेवर आलेले हे सरकार येत्या दोन दिवसांमध्येच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार आहे.


Maha Vikas Aghadi Sarkar Live Updates: 'मी.. उद्धव बाळासाहेब ठाकरे...शपथ घेतो की..' हे शब्द गुरुवारी (28 नोव्हेंबर 2019) सायंकाळी 6 वा 40 मिनिटांनी मुंबई येथील शिवाजी पार्क (शिवतिर्थ) मैदानावर घुमले आणि राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकासआघाडी सरकार सत्तेवर आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत महाविकासआघाडीतील एकूण सहा मंत्र्यांनी मंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यात शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून, छगन भुजबळ आणि जयंत पाटील तर, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून बाळासाहेब थोरात, नितीन राऊत या मंत्र्यांनी शपथ घेतली. या शपथविधीस देशभरातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. शपथविधी पार पडल्यानंतर महाविकासआघाडी सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. आज (शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019) या सरकारचा पहिलाच दिवस असून, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून दुपारी एक वाजता पदभार स्वीकारणार आहेत. या पदभारासोबत राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठीसोबत जोडलेले राहा.

महाविकासआघाडी सरकारकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणूक 2019 नंतर देशभरात भारतीय जनता पक्षाचा विजयरथ चौफेर दवडताना पाहायला मिळाला. लोकसभा निवडणूक 2014 नंतर देशभरात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या विजयाचा प्रभाव पाहायला मिळाला. लोकसभा निडणूक 2019 आणि विविध राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणूक 2019 मध्येही भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांचीच सरशी झाली. नाही म्हणायला अपवाद म्हणून राजस्थान, मध्य प्रदेश आदी राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाला पूर्ण बहुमताने सत्ता मिळाली. पण, काही राज्यांमध्ये प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरुनही काँग्रेस आणि संपुआला विरोधी पक्षात बसावे लागले. भाजपच्या आक्रमक राजकारणामुले काँग्रेस आणि संपुआची मोठी पिछेहाट झाली. महाराष्ट्र मात्र याला अपवाद ठरला. (हेही वाचा, Maharashtra Government Formation: बहुमत चाचणी नंतर अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद?)

महाराष्ट्रात शरद पवार यांचे राजकीय कसब कामी आले आणि भाजपच्या आक्रमक राजकारणाला पायबंध बसला. विशेष म्हणजे राज्यात काँग्रेस नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर असताना आणि विधानसभा निवडणुकीत सत्ताबाजारात सर्वात छोटा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळाली. देशभराती राजकीय वर्तुळासाठी हा मोठा आश्चर्यकारक क्षण होता. पण, असे घडले खरे. त्यामुळे या सरकारकडे देशाचे लक्ष लागले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now