CM Uddhav Thackeray यांनी मुंबई त J J Hospital मध्ये घेतला Covaxin Vaccine चा पहिला डोस
28 दिवसांनी पुन्हा त्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज मुंबई मध्ये जे जे रूग्णालयात (J J Hospital) कोविड 19 विरूद्धची लस (COVID 19 Vaccine) घेतली आहे. आज त्यांना कोविड लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. डॉ. तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी ही लस घेतली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार उद्धव ठाकरे यांनी जे जे रूग्णलयामध्ये भारत बायोटेकची Covaxin Vaccine घेतली आहे. काही दिवसांपूर्वी जे जे रूग्णालयामध्ये एनसीपी अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी कोविड 19 ची लस घेतली आहे.
दरम्यान आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, चिरंजीव आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे जे रूग्णालयामध्ये त्यांच्या सासूबाई आणि स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी देखील लस टोचून घेतली आहे. 28 दिवसांनी पुन्हा त्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे.
लस घेतल्यानंतर मीडीयाशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पात्र नागरिकांना लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केले आहे. लस टोचताना त्रास होत नाही असे देखील म्हटलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी काही भागात लॉकडाऊन करावा लागेल असे संकेत दिले आहेत.