Maharashtra Assembly Election 2019: मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथे 'मुंबई चालली भाजपसोबत' अभियान राबवून देवेंद्र फडणवीस यांचा जनतेशी संवाद

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मरिन ड्राईव्ह येथे मॉर्निंग वॉक करत भाजपचा प्रचार केल्याचे समोर आले आहे.

Devendra Fadnavis (Photo Credit: ANI)

विधानसभा निवडणूकीला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले असून सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मरिन ड्राईव्ह येथे मॉर्निंग वॉक करत भाजपचा प्रचार केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, फडणवीस यांनी रविवारी सकाळी 'मुंबई चालली भाजपसोबत' असे अभियान राबवून प्रचाराला सुरुवात केली आहे. तसेच शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी देखील वांद्रे पश्चिम येथे मॉर्निंग वॉक करत नागरिकांशी संवाद साधला. भाजपच्या या अनोख्या पद्धतीच्या प्रचाराला मुंबईतील लोकांनी मोठी पसंती दर्शवली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्ष नव्या योजना आखताना दिसत आहे. एवढेच नव्हेतर, अनेक पक्षांकडून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीने प्रचार केला जात आहे. यातच भारतीय जनता पक्षाने रविवारी सकाळी मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडणुकीत भाजपने 'मुंबई चालली भाजपसोबत' हे अभियान हाती घेतले आहे. यावेळी कुलाबा मतदारसंघाचे उमेदवार राहूल नार्वेकरसह भाजप कार्यकर्तेही उपस्थित होते. रविवार असल्याने मरिन ड्राईव्हला येथे मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी होती. याचाच फायदा घेत भाजपने अनोख्या पद्धतीच्या प्रचाराची सुरुवात केली. दरम्यान, फडणवीस यांनी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. हे देखील वाचा-महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: राहुल गांधी आज मुंबई आणि लातूर मध्ये घेणार सभा; काँग्रेसच्या प्रचाराचा श्रीगणेशा, पहा संपूर्ण वेळापत्रक

ANIचे ट्वीट-

दरम्यान, शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनीही वांद्रे पश्चिम येथे मॉर्निंग वॉक करत नागरिकांशी संवाद साधला आहे. तसेच नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी चारकोप येथे आणि भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी कांदिवली पूर्व येथे मॉर्निंग वॉक करत मतदारांशी संवाद साधला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif