मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, पाहा या क्षणाचे सुंदर फोटोज, See Pics

या कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांसह, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)देखील उपस्थित होते.

Balasaheb Thackeray Statue (Photo Credits: ANI/Twitter)

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Birth Anniversary) यांची आज 95 वी जयंती... या निमित्ताने शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचे मोठेमोठे पोस्टर्स लावले होते. या दिवसाचे औचित्य साधून आज मुंबईतील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी या पुतळ्याचे अनावरण करताच बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर मनमोहक अशी पुष्पवृष्टी करण्यात आली. या कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांसह, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)देखील उपस्थित होते.

त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री आदित्य ठाकरे व अस्लम शेख, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आदी मान्यवर उपस्थित होते.हेदेखील वाचा- बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण; शरद पवार, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

मुंबईत उभारण्यात आलेला बाळासाहेबांचा पुतळा 9 फूट उंचीचा असून त्यासाठी 1200 किलो ब्रॉंझ धातू वापरण्यात आला आहे. दोन फूट उंच हिरवळ आणि सुमारे 14 फूट उंचीच्या चौथऱ्यावर हा पुतळा बसवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील बाळासाहेबांचा हा पहिलाच भव्य पुतळा ठरणार आहे. प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली असून ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकारला आहे.

मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा कुठे असावा याबाबत अनेक वादविवाद सुरु होते. त्यात अखेर गेट वे ऑफ इंडिया येथील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इमारतीसमोर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटात हा पुतळा उभारण्याचे ठरले.