Rashmi Thackeray Admitted to Hospital: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे उपचारासाठी रुग्णालयात दाखल
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Uddhav Thackeray) यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Uddhav Thackeray) यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी 23 मार्च रोजी कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आज त्यांना मुबई येथील एचएन रिलायन्स रुग्णालयामध्ये (HN Reliance Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांना पोस्ट कोव्हिड19च्या तपासणीसाठी रग्णालयात दाखल करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु, रश्मी ठाकरे यांना नेमके कशासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे? यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
रश्मी ठाकरे यांना 23 मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती. कोरोना होऊन गेल्यानंतरही शरीरावर त्याचे परिणाम होतात. यासाठी डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक असते. यामुळे रश्मी ठाकरे यांना पोस्ट कोविड तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची शक्यता आहे. रश्मी ठाकरे यांच्यासह त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. हे देखील वाचा- Sharad Pawar Health Updates: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत पुन्हा बिघडली; मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात आज 31643 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 20854 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2353307 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 336584 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.71% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.