Uddhav Thackeray On Sakinaka Rape Case: साकीनाका बलात्कार प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडिताला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान, पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे.

Uddhav Thackeray (Photo Credit: Facebook)

Sakinaka Rape Case: मुंबईच्या (Mumbai) साकीनाका (Sakinaka) परिसरात महिलेवर बलात्कार (Rape) करुन आरोपीने गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानुष प्रकार घडला आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडिताला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान, पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर संपूर्ण महाराष्ट्रातून संतापजनक प्रतिकिया येऊ लागल्या आहेत. याप्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याचे गृहमंत्री आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी या प्रकरणातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साकीनाका येथे खैराना रोडवर एक महिला रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडली आहे, असा फोन कंट्रोल रुमला गुरुवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास आला होता. त्यानंतर पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पीडित महिलेला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, आज उपचारदरम्यान पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- Mumbai Sakinaka Rape Case: साकीनाका बलात्कार प्रकरणात एकच आरोपी, महिलेचा जबाब घेता आला नाही- मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे

ट्वीट-

याप्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "साकीनाका परिसरात घडलेला प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा आहे. या प्रकरणातील गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल", असे सांगताना उद्धव ठाकरे यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले आहे.

महाराष्ट्रात काही दिवसांपासून महिला अत्याचार आणि बलात्काराच्या घटनेत वाढ झाली आहे. यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तसेच याप्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशा मागणींनी जोर धरला आहे.