Ashadhi Ekadashi Mahapooja 2022: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रखुमाईची सपत्नीक शासकीय महापूजा
मुख्यमंत्र्यांसोबत महापुजेचा मान शेतकरी मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले यांना मिळाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ( Shri Vitthal Rukimini Mandir at Pandharpur) आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi Mahapooja 2022) निमित्त परंपरेप्रमाणे शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्र्यांसोबत महापुजेचा मान शेतकरी मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले यांना मिळाला. नवले कुटुंबीय हे पाठिमागील 20 वर्षांपासून वारी करत आहेत. तर मुख्यमंत्री शिंदे यांची ही पहिलीच शासकीय महापूजा आहे. पंढरपूरमध्ये जाहीर झालेल्या निवडणुकांमुळे मुख्यमंत्र्यांची महापूजा कशी पार पडणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने काही अटी व शर्तींवर ही महापूजा करण्यास संमती दिली. त्यामुळे कोणत्याही अडथळ्याविना ही पूजा पार पडली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूर येथे शनिवारी रात्री उशिरा पंढरपूर येथे पोहोचले. या वेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापुजेसाठी ते पहाटेटच उपस्थित राहिले.
ट्विट
ट्विट
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री शिंदे हे दिवसभर विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवणार आहेत. ते सकाळी सकाळी 11.15 वाजता शासकीय विश्रामगृह येथे ‘सुंदर माझे कार्यालय’ या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर लगेच सकाळी 11.45 वाजता पंढरपूर पंचायत समिती येथे 'स्वच्छता दिंडी' समारोपात सहभागी होतील. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता ते पक्षमेळाव्यासही उपस्थित राहणार आहेत.