Republic Day 2021: तिरंगी रंगात सजली मुंबई; प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि महानगरपालिकेच्या इमारतीला विद्युत रोषणाई
देशभरात उद्या 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिन (Republic Day 2021) साजरा केला जाणार आहे. हा देशाचा 72 वा प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) आणि मुंबई महानगरपालिका इमारतीला (BMC) तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
देशभरात उद्या 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिन (Republic Day 2021) साजरा केला जाणार आहे. हा देशाचा 72 वा प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) आणि मुंबई महानगरपालिका इमारतीला (BMC) तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सायंकाळच्या काळोखात मुंबईचे हे तिरंग्यातील रूप नागरिकांना सुखावत आहे. तर काहींनी ही दृष्ये आपल्या कॅमेर्यात कैद केली आहेत. देशावर करोनाचे सावट असले तरी यंदाचा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करण्यासाठी प्रत्येक भारतीय सज्ज झाला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या प्रत्येक राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पुरस्कार वितरण हाही या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग असतो. भारताचे राष्ट्रपती यादिवशी पद्म पुरस्कारांचे वितरण करतात. यात पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्कारांचा समावेश असतो. हे देखील वाचा- PM National Bravery Award 2021: अभिमानास्पद! महाराष्ट्रातील 5 मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर
फोटो-
फोटो-
फोटो-
प्रजासत्ताक दिन हा भारताच्या संविधानाचे महत्व अधोरेखित करतो. त्यामुळे हा दिवस संपूर्ण देशात उत्साहाने साजरा केला जातो. या दिवसाचे सर्व मुख्य कार्यक्रम हे देशाची राजधानी दिल्लीत राष्ट्रपतींच्या उपस्थितीत साजरे केले जातात. राजपथावर भारताचा आणि त्याच्या विविधतेच्या गौरवार्थ एका भव्य पथसंचलनाचे आयोजन केले जाते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)