Maharashtra Cabinet Expansion: नागपूरमध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार सोहळा सुरू; पहा शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची संपूर्ण यादी

महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन कॅबिनेट मंत्र्यांना मंत्रीपदाची शपथ देत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्ष (भाजप), शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) सुमारे 40 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

Maharashtra cabinet expansion ceremony (फोटो सौजन्य - ANI)

Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा (Maharashtra's Cabinet Expansion Ceremony) नागपुरात (Nagpur) सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे या सोहळ्याला उपस्थित आहेत. याशिवाय, महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन (Maharashtra Governor CP Radhakrishnan) कॅबिनेट मंत्र्यांना मंत्रीपदाची शपथ देत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्ष (भाजप), शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) सुमारे 40 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

महायुती सरकारमधील खात्यांचे वाटप निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहखाते मागितले असले तरी ते भाजपकडेच राहणार आहे. तसेच महसूल खातेही भाजपच्या ताब्यात राहणार आहे. 5 डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानात पार पडला. यानंतर मंत्रिमंडळ विस्तारासाठी नागपूरची निवड करण्यात आली आहे. (हेही वाचा -Maharashtra Cabinet Expansion 2024: शिवसेनेकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ)

आतापर्यंत मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या आमदारांची नावे -

  • राधाकृष्ण विखे-पाटील (भाजप)
  • चंद्रकांत पाटील (भाजप)
  • चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)
  • हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी)
  • गिरीश महाजन (भाजप)
  • गुलाबराव पाटील (शिवसेना)
  • धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)
  • संजय राठोड (शिवसेना)
  • दादा भुसे (शिवसेना)
  • उदय सामंत (शिवसेना)
  • मंगल प्रभात लोढा (भाजप)
  • पंकजा मुंडे (भाजप)
  • अतुल सावे (भाजप)
  • अशोक उईके (भाजप)
  • आशिष शेलार (भाजप)
  • शंभूराज देसाई (शिवसेना)
  • दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी)
  • गणेश नाईक (भाजप)
  • अदिती तटकरे (राष्ट्रवादी)
  • शिवेंद्रराजे भोसले (भाजप)
  • संजय सावकारे (भाजप)
  • नरहरी झिरवाल (नसीप)
  • माणिकराव कोकाटे
  • जयकुमार गोरे
  • भरत गोगावले (शिवसेना)
  • संजय शिरसाट (शिवसेना)

     

  • मकरंद जाधव-पाटील (राष्ट्रवादी)

     

  • आकाश फुंडकर (भाजप)

एकनाथ शिंदे गट शिवसेनेला नगरविकास, गृहनिर्माण, उद्योग, आरोग्य, वाहतूक, पर्यटन, तंत्रज्ञान, मराठी भाषा आणि एमएसआरडीसी (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) ही खाती मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ, सहकार आणि क्रीडा यासारख्या महत्त्वाच्या खात्यांसह इतर महत्त्वाची मंत्रिपदं मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now