Maharashtra Budget 2020-21 Highlights: 2 लाखाच्या वर कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा; महाराष्ट्र अर्थसंकल्पात मिळणार 'ही' सवलत

एकत्रित रित्या शेतकरी कर्जमाफीसाठी 22 हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे.

Image For Representation (Photo Credits: File Image)

Maharashtra Budget 2020-21: महाराष्ट्र राज्याचा 2020- 21  साठीचा अर्थसंकल्प नुकताच जाहीर झाला, यामध्ये कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. यापैकी सर्वात मोठा दिलासा म्हणजे 2 लाखाच्या वर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम भरण्यासाठी सरकारकडून 2 लाख रुपयांची सवलत देण्यात येणार आहे, म्हणजेच संपूर्ण कर्जाच्या रक्कमेतील 2 लाख रुपये हे सरकारच्या अनुदानातून जाणार आहे. याशिवाय, कराचे हफ्ते नियमित भरणाऱ्यांसाठी 50 हजारांची प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार असल्याचे सुद्धा अर्थसंकल्पात सांगण्यात आले आहे. मागील वर्षात पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना केंद्राकडे मागितलेली रक्कम मंजूर न करता केंद्राकडून केवळ 956 कोटी 13 लाख रक्कम मंजूर करण्यात आली. मात्र अशा वेळीकेंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने स्वतः पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना आधार दिला आहे, असे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले आहे.Maharashtra Budget 2020-21 Live Updates: महाराष्ट्र अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे जाणून घ्या

प्राप्त माहितीनुसार, उद्धव ठाकरे सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 9 हजार 35 कोटी रक्कमेची कर्जमाफी देण्यात आली आहे. यामध्ये 2 लाख व त्यापेक्षा कमी पीककर्ज असणाऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर झाली होती. मात्र सोबतच २ लाखापेक्षा अधिक कर्ज असणाऱ्यांना सुद्धा सवलत देऊन ठाकरे सरकारने मोठा दिलासा दिला आहे, यामुळे एकत्रित रित्या शेतकरी कर्जमाफीसाठी 22 हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे.

Maharashtra Budget 2020: राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी एक पोलीस स्थानक उभारणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

दरम्यान, शेतकऱ्यांच्या वीज पुरवठा मागणीचा विचार करून येत्या वर्षात राज्यातील सर्व शेतीला वीजपुरवठा हा सौर पंपावरून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौर पंप बसवण्यात येणार आहेत यासाठी 6700 कोटींची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

शेतसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांना ऊसासह इतर पिकांसाठी ठिबक सिंचनासाठी 80 टक्के अनुदान देण्यात येणार असल्याची सुद्धा अजित पवार यांनी घोषणा केली. सध्या ठराविक तालुक्यांमध्ये ही योजना राबवण्यात येत आहे हीच योजना वाढवून आता तालुक्यातील ही योजना संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.