Maharashtra Board SSC Results 2019: महाराष्ट्र बोर्ड 10 वी चे पेपर्स रिचेकिंगला देण्यासाठी mahresult.nic.in या वेबसाईटवरुन अर्ज कसा कराल?

वेबसाईटवरुन निकाल कसा डाऊनलोड कराल?

SSC Results 2019 (Photo Credits: Pixabay)

MSBSHSE 10th Std Results 2019: महाराष्ट्र बोर्ड माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल 8 जून रोजी जाहीर केला. मंडळाच्या अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल. यंदा दहावीची परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च दरम्यान पार पडली. गेल्या वर्षी 89.41 % विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. मात्र यंदा हा टक्का घसरला असून राज्याचा निकाल 77.10% लागला आहे. यातही मुली सरस ठरल्या असून मुलींचा निकाल 82.82% लागला आहे तर मुलांचा निकाल 72.18% लागला आहे. (मुंबई : मीरा रोड येथील अक्षित जाधव ची महाराष्ट्र बोर्ड SSC Result 2019 मध्ये अनोखी कामगिरी; सार्‍या विषयात 35% गुणांसह पास होणारा एकमेव विद्यार्थी)

वेबसाईटवरुन निकाल डाऊनलोड करण्यासाठी सोप्या स्टेप्स:

# सर्वप्रथम बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.

# वेबसाईटवरील Maharashtra SSC Result 2019 या लिंकवर क्लिक करा.

# तेथे आवश्यक ती माहिती उदा. रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, इत्यादी.

# त्यानंतर समिट बटणावर क्लिक करा.

# निकाल स्क्रिनवर झळकेल.

# त्यानंतर तुम्ही निकाल डाऊनलोड करु शकता किंवा त्याची प्रिंट घेऊ शकता.

मिळालेल्या गुणांवर समानाधी नसलेले विद्यार्थी पेपर्स रिव्हॅल्युएशनसाठी पाठवू शकतात. यासाठी त्यांना मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. वेबसाईटवर रिव्हॅल्युएशनसाठी ऑनलाईन अर्ज बोर्डाकडून सुरु करण्यात आला आहे. अर्ज भरल्यानंतर साधारणपणे 15 दिवसांनंतर बोर्डाकडून दहावीचा रिचेकींग निकाल जाहीर करण्यात येईल.