Maharashtra Board SSC Result 2022 तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला!

आता त्यांना निकालाचे वेध लागले आहेत.

Representational Image (Photo Credits: PTI)

महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल आठवडाभरापूर्वी लागल्यानंतर आता दहावीच्या निकालाची (Maharashtra Board SSC Result) उत्सुकता शिगेला पोहाचली आहे. यंदा बोर्डाच्या परीक्षा राज्यात कोरोना संकटाच्या सावटाखालीच झाल्या आहेत त्यामुळे निकाल कसा लागेल याची धाकधूक वाढली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार 15 जूनपर्यंत 10वीचा निकाल लागेल असे सांगण्यात आले होते पण अद्याप 10 वी निकालाची तारीख जाहीर झालेली नाही.

India Today कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, त्यांचे शिक्षण मंडळाच्या प्रवक्त्यांसोबत बोलणी झाली आहेत यामध्ये 15 जूनला निश्चितच निकाल जाहीर करण्याचा बोर्डाचा विचार नाही तसेच अद्याप 10 वी निकालाच्या तारखेची घोषणा देखील झालेली नाही.

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जून महिन्याच्या अखेरीपर्यंत दहावीचा निकाल लागू शकतो असे संकेत दिले होते. आतापर्यंत बोर्डाच्या निकालाचा इतिहास पाहता तारीख ही किमान 1 दिवस आधीच जाहीर केली जाते त्यामुळे आता 15 जूनला तरी निकाल नसेल असेच चित्र आहे. नक्की वाचा: Maharashtra Board 10th 12th Result 2022 Date: इयत्ता दहावी, बारावी बोर्ड परीक्षा निकाल कधी जाहीर होणार? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली घोषणा .

दरम्यान दहावीचा निकाल यंदा 12वी प्रमाणेच बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट्स msbshse.co.in, hscresult.mkcl.org, mahresult.nic.in. वर पाहता येणार आहेत. निकाल पाहण्यासाठी तुमच्याकडे तुमचा रोल नंबर आणि आईचं नाव ही माहिती तयार ठेवा.

10 वीचा निकाल कसा पहाल?

यंदा 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधी मध्ये पार पडलेल्या 10वीच्या परीक्षेत अंदाजे 17 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आता त्यांना निकालाचे वेध लागले आहेत.