Maharashtra Board HSC Result 2024: MSBSHSE कडून लवकरच जाहीर होणार 12वीचा निकाल mahresult.nic.in वर; विद्यार्थ्यांना बोर्डाकडून तारखेच्या घोषणेचे वेध!

त्यासाठी त्यांना रोल नंबर आणि आईचे नाव हे तपशील अपलोड करावे लागतील

निकाल । File Image

आयसीएससी आणि सीबीएसई बोर्डाचे दहावी, बारावीचे निकाल लागल्यानंतर आता महाराष्ट्र राह्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या 10वी, 12वीच्या निकालाचे वेध लागले आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार MSBSHSE देखील आता 10 वी 12वी चे निकाल यंदा लवकर जाहीर करणार आहे. 12वीचा निकाल मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने आता विद्यार्थ्यांना एचएससी बोर्ड परीक्षा निकाल आणि एसएससी बोर्ड परीक्षा निकाल तारीख कधी जाहीर होतेय? याचे वेध लागले आहेत. दरवर्षी प्रमाणे बोर्ड यंदा mahresult.nic.in वर 10वी, 12वीचे निकाल ऑनलाईन आधी जाहीर करेल नंतर ऑफलाईन गुणपत्रिका हाती देईल.

यंदा बोर्ड परीक्षेत 12वी ला 14 लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. तसेच 12वीच्या निकालावर त्यांचा करियर मधील पुढील प्रवास अवलंबून असल्याने या परीक्षेच्या निकालाकडे त्यांचं विशेष लक्ष आहे. 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान बोर्डाची बारावीची परीक्षा झाली आहे आणि आता त्यांना निकालाची उत्सुकता आहे.

बारावीचे विद्यार्थी mahresult.nic.in वर किंवा बोर्डाने उपलब्ध केलेल्या अन्य थर्ड पार्टी वेबसाईट्स वर निकाल पाहू शकतील. त्यासाठी त्यांना रोल नंबर आणि आईचे नाव हे तपशील अपलोड करावे लागतील त्यांनंतर त्यांचा निकाल पाहता येईल. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी त्यांना किमान 35% मार्क्स प्रत्येक विषयात आवश्यक आहेत.

12वीचा निकाल ऑनलाईन कसा पहाल?

मागील वर्षी बारावीचा निकाल 91.25% लागला होता. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तो जाहीर करण्यात आला होता.