Maharashtra Board HSC Result 2024 Declared: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल यंदा 93.37 %; 1वाजता mahresult.nic.in वर पहा मार्क्सशीट
mahresult.nic.in सह थर्ड पार्टी वेबसाईट वर दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल पाहता येणार आहे.
MSBSHSE 12th Results 2024: महाराष्ट्रात आज (21 मे ) दिवशी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) बारावीचा निकाल (HSC Result) जाहीर झाला आहे. या परीक्षेचा राज्याचा निकाल 93.37 % लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. यंदा बोर्डाच्या परीक्षेतही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 95.44 टक्के तर मुलांचा निकाल 91.60 टक्के लागला आहे. बोर्डाने केवळ सध्या निकालाची आकडेवारी जाहीर केली आहे. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकालात त्यांचा सविस्तर निकाल पाहता येणार आहे. दरम्यान श्रेणीसुधार परीक्षा जुलै महिन्यामध्ये होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीचा निकाल 2% पेक्षा अधिक आहे. 26 विषयांचा निकाल 100% लागला आहे.
इथे पहा 9 विभागांमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी
पुणे ९४.४४
नागपूर ९२.१२
छत्रपती संभाजीनगर ९४.०८
मुंबई ९१.९५
कोल्हापूर ९४.२४
अमरावती ९३.००
नाशिक ९४.७१
लातूर ९२.३६
कोकण ९७. ५१
1 वाजता पहा बारावीचा ऑनलाईन निकाल
महाराष्ट्र बोर्डाचा एचएससी चा निकाल mahresult.nic.in, http://hscresult.mkcl.org,www.mahahsscboard.in, https://results.digilocker.gov.in, http://results.targetpublications.org किंवा https://www.tv9marathi.com/ यावर ऑनलाईन पाहता येणार आहे. SMS च्या माध्यमातून निकाल पाहण्यासाठी MHHSC (SEAT NO)आणि तो 57766 वर पाठवल्यास तुम्हांला निकाल पाहता येणार आहे. MSBSHSE 12th Results on DigiLocker: महाराष्ट्र बोर्डचा 12वीचा निकाल यंदा डिजीलॉकर वरही उपलब्ध; digilocker.gov.in, DigiLocker App वर असे पहा मार्क्स!
बोर्डाकडून जाहीर केलेला निकाल तुम्हांला योग्य वाटत नसल्यास तुमम्चे गुण फेरपडताळणीसाठी अर्ज करू शकाल. आज निकाल जाहीर झाल्यानंतर 10 दिवसांनी गुणपत्रिका प्रत्यक्षात मिळणार आहेत.