Maharashtra Board Exam Results 2020: 10 वी आणि 12 वी बोर्डाचा निकाल जुलै महिन्यात लागण्याची शक्यता, विद्यार्थ्यांना mahresult.nic.in वर पाहता येणार निकाल
बोर्डाचे निकाल लागण्यास सध्या वेळ लागत असून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर वाढत्या रुग्णांसह लॉकडाऊन सुद्धा राज्यात वाढवण्यात आला आहे.
SSC & HSC Board Exam Results 2020: महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि सेंकेंडरी आणि हायर एज्युकेशन (MSBSHSE) यांनी SSC (10वी) आणि HSC (12वी) बोर्ड परीक्षा 2020 चा निकाल लवकरच जाहीर करु असे म्हटले आहे. बोर्डाचे निकाल लागण्यास सध्या वेळ लागत असून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर वाढत्या रुग्णांसह लॉकडाऊन सुद्धा राज्यात वाढवण्यात आला आहे. मात्र अद्याप महाराष्ट्र बोर्डाकडून निकाल कधी लावणार याबाबत अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. परंतु शिक्षण विभागाकडून असे सांगण्यात आले आहे की, राज्यात येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. त्यामुळे 10 वी आणि 12 वी बोर्डाचा निकाल जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येऊ शकतो.
तर यापूर्वी वृत्तपत्रांच्या रिपोर्ट्स मधून असे समोर आले होते की, 10 जूनला निकाल जाहीर होणार आहेत. यावर शिक्षण विभागाने स्पष्टीकरण देत निकाल जाहीर होणार नसल्याचे म्हटले होते. कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला आहे. नाहीतर बोर्डाकडून मे किंवा जून महिन्यात निकाल जाहीर करण्यात येतो. तसेच सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता पेपर तपासणीच्या कामाला सुद्धा लॉकडाऊनमुळे विलंब लागत आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र बोर्डाने 12 वी चा निकाल 28 मे आणि 10 वी चा निकाल 8 जूनला जाहीर केला होता.(10th and 12th Board Exam Results 2020 Dates: SSC आणि HSC चे निकाल 'या' तारखेला लागण्याची शक्यता)
यंदा कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षेत शेवटचा म्हणजे भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता ज्याचे गुण आता सरासरीनुसार देण्यात येणार आहेत. तर लॉकडाउन लागू होण्याआधी 12 वी बोर्ड परिक्षेच्या सर्व विषयांचे पेपर पूर्ण झाले होते. तर विद्यार्थ्यांसह पालकांना कशी पद्धतीने निकाल पाहता येणार आहे ते जाणून घ्या.
>>महाराष्ट्र 10 वी आणि 12 वी बोर्डाचा निकाल mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहण्यासाठी या सोप्प्या स्टेप्स लक्षात ठेवा:
-निकाल पाहण्यासाठी प्रथम mahresult.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या
-Board Results ऑप्शनवर क्लिक करा
-MSBSHSE रिजल्ट पेज तुमच्या समोर सुरु होईल
- विद्यार्थ्याने त्याचा क्रमांक आणि अन्य तपशील द्यावा
-रिजल्ट पाहण्यासाठी तेथे देण्यात आलेल्या ऑप्शनवर क्लिक करावे
-रिजल्ट दिसल्यावर त्याची प्रत Save करा.
दरम्यान, यंदाचे शैक्षणिक वर्ष सुद्धा 15 जून पासून सुरु करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. कोरोना सारख्या परिस्थितीत शिक्षणाला अडथळा येत नाही हे महाराष्ट्राने देशाला दाखवून द्यावे आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरू करता येणे शक्य आहे तिथे त्या सुरू करणे,जिथे ऑनलाईन शक्य आहे तिथे त्यापद्धतीने का होईना पण शिक्षण सुरू झाले पाहिजे असे मत अलीकडे मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले होते.