MHT CET Result 2019: महाराष्ट्र बोर्ड सीईटी चा निकाल आज mhtcet2019.mahaonline.gov.in वर लागण्याची शक्यता
Representational Image (Photo Credits: Facebook)

Maharashtra Board CET Result 2019: 28 मे रोजी महाराष्ट्र बोर्डाचा 12 वी चा (HSC Result) निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थांना इंजिनियरिंग, मेडिकल आणि औषधशास्त्रातील सीईटी परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा आहे. महाराष्ट्र बोर्ड सीईटीचा निकाल आज लागण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना mhtcet2019.mahaonline.gov.in वर हा निकाल ऑनलाईन पाहता येईल. (महाराष्ट्र बोर्ड 10 वी चा निकाल येत्या आठवड्यात mahresult.nic.in या वेबसाईटवर लागण्याची शक्यता)

कुठे व कसा पहाल निकाल?

# mhtcet2019.mahaonline.gov.in साईटवर तुम्ही निकाल पाहू शकाल.

# download MAH CET 2019 result अशा टॅबवर क्लिक करा.

# तुम्ही नव्या विंडोवर रिडिरेक्ट व्हाल.

# आवश्यक माहिती एन्टर केल्यानंतर तुम्हांला निकाल पाहता येऊ शकतो.

# MAH CET 2019 result ची मेरीट लिस्ट तुम्हांला डाऊनलोड करण्याची सोय आहे.

महाराष्ट्रामध्ये 2 ते 13 मे 2019 दरम्यान सीईटी परीक्षा पार पडली होती. महाराष्ट्रात यंदा 3 लाख 96 हजार विद्यार्थी एमएचटी सीईटी या परीक्षेला बसले होते. हे परीक्षार्थी पीसीएम, पीसीबी आणि पीसीएमबी या गटांमध्ये परीक्षेला सामोरे गेले होते.