महाराष्ट्र विधिमंडळात निलंबित करण्यात आलेल्या 12 भाजपा आमदार प्रकरणी कोर्टात याचिका दाखल करणार; आशिष शेलार यांची माहिती

दरम्यान याच निर्णयाविरूद्ध आता भाजपा कडून न्यायालयातून याचिका दाखल केली जाणार आहे.

Ashish Shelar | (File Photo)

महाराष्ट्र विधिमंडळाच्या यंदाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी भाजपा आमदारांनी तालिका अध्यक्षांसोबत गैर वर्तन आणि सभागृहात गदारोळ घातल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. भाजपच्या 12 आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलं आहे. दरम्यान याच निर्णयाविरूद्ध आता भाजपा कडून न्यायालयातून याचिका दाखल केली जाणार आहे. महाराष्ट्र भाजपाचे नेते आणि निलंबित आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज त्याबददल माहिती दिली आहे. नक्की वाचा:  Maharashtra Monsoon Assembly Session 2021: तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी आशिष शेलार, गिरीश महाजन यांच्यासह 12 भाजपा आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन.

'महाराष्ट्राच्या विधिमंडळात अशाप्रकारची कारवाई पहिल्यांदाच झाली आहे. आम्ही या कारवाईचा निषेध करत विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली कोर्टात याचिका दाखल करणार' असल्याचे देखील आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. भाजपा कडून सातत्याने तालिका अध्यक्ष आणि सत्ताधारी पक्ष खोट्या कहाण्या रचून काही तरी सांगत आहेत. आम्ही भास्कर जाधवांसोबत गैर वर्तन केलेले नाही. उलट त्यांनीच एकतर्फी निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ANI Tweet

आशिष शेलारांनी ठाकरे सरकारचा उल्लेख 'तालिबानी सरकार' असा केला आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांचे विनाकारण निलंबन करत लोकशाहीचा खून केला असल्याचं म्हटलं आहे. निलंबनाच्या कारवाई नंतर शेलार राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यादेखील भेटीला गेले होते.