महाराष्ट्र: भिवंडी मधील एका मस्जिदीचे COVID19 च्या केंद्रात रुपांतर, रुग्णांना निशुल्क ऑक्सिजनची उपलब्धता
येथे रुग्णांना निशुल्क ऑक्सिजनची उपलब्धता करुन देण्यात येणार आहे. मस्जिदीच्या प्रशासकांनी मानवता धर्म स्विकारत हे महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातील एका मस्जिदीला कोविड19 च्या केंद्रात रुपांतरण करण्यात आले आहे. येथे रुग्णांना निशुल्क ऑक्सिजनची उपलब्धता करुन देण्यात येणार आहे. मस्जिदीच्या प्रशासकांनी मानवता धर्म स्विकारत हे महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मस्जिदीचे संचालक जमात-ए- इस्लामी हिंदचे स्थानीय चॅप्टर, मुव्हमेंट फॉर पीस अॅन्ड जस्टिस व शांति नगर ट्रस्टने शांति नगर परिसरातील मक्का मस्जिदीला कोविड19 च्या केंद्रात रुपांतर केले आहे.
जेआयइएचच्या एका पदाधिकाऱ्यांनी असे सांगितले की, अस्थायी केंद्राला सर्व समुदायातील नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. ऑक्सिजन सिलिंडर पेक्षा कमी क्षमतेचे पाच बेड्ससह जेआयइएच कडून गरज पडल्यास रुग्णांच्या घरातील परिवाराला मदत करण्यात येते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, भिवंडी-निजामपुर महापालिकेत कोविड19 चे 1332 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 88 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.(COVID19 In Maharashtra Today: कोरोनामुळे प्रशासन हादरले! महाराष्ट्रात आज तब्बल 4 हजार 841 रुग्णांची नोंद; 192 जणांचा मत्यू)
जेआयएचच्या भिवंडी चॅप्टरचे अध्यक्ष औसफ फलाही यांनी असे सांगितले की, भिवंडी-निजामपुरात कोरोनाचे संक्रमण सर्वाधिक परसले आहे. कारण हे एक दाटीवाटीचे शहर आहे. येथे पर्याप्त आरोग्याच्या सुविधा सुद्धा उपलब्ध नाहीत. कोरोना व्हायरस सारख्या महासंकटाच्या काळात हालत अधिक बिघडत आहे. कारण सामान्य डॉक्टरांनी कोरोनाचा प्रादुर्भाव पसरत असल्याच्या भीतीने त्यांचे क्लिनिक सुद्धा बंद ठेवले आहेत.
या परिसरातील बहुतांश लोक कोरोनाच्या परिस्थितीबाबत जागृत नाहीत. त्याचसोबत कोरोनाच्या आजारपणाचा खर्च सुद्धा त्यांना करता येणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच अशा पद्धतीच्या केंद्राची सध्याच्या काळात गरज आहे. फलाही यांनी असे ही म्हटले की, 70 हून अधिक लोकांना याचा फायदा झाला आहे. केंद्रात दोन डॉक्टर्स असून कोरोना व्हायरसच्या 8 रुग्णांच्या घरात 15 ऑक्सिजन सिलेंडर पाठवण्यात आले आहेत.
मस्जिद मध्ये विविध धर्मातील लोकांवर उपचार करण्यात येत आहेत. शांति नगर ट्रस्टचे कैसर मिर्जा यांनी असे म्हटले की, लॉकडाऊन नंतरच मक्का मस्जिग नमाजासाठी बंद करण्यात आले आहे. तर लोकांच्या मदतीसाठी मस्जिदीचा एक हिस्सा वापरण्याचा निर्णय घेतला असून ज्यांना एखाद्या ठिकाणी जाऊन उपचार घेणे अशक्य असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.