IPL Auction 2025 Live

Manjra Dam Water Level: मांजरा धरणात केवळ 25 टक्केच पाणीसाठा; बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यावर पाणी संकट

कारण अनेक प्रकल्पातील पाणी आटले असून, काही ठिकाणी अल्प पाणीसाठा शिल्लक असल्याचे चित्र आहे.

Dam | (Photo credit: ANI))

लातूर (Latur) शहरासह केज (Cage), धारूर (Dharur), अंबाजोगाई (Ambajogai), कळंब (Kallam) आदी प्रमुख गावांना पाणी पुरवठा करणारं मांजरा धरण अर्धा पावसाळा संपला तरी रिकामंच आहे. सध्या मांजरा धरणात केवळ 25 टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. बीडच्या केज तालुक्यातील धनेगावच्या मांजरा धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याचं समोर आलं आहे. गेल्या आठवड्यात 26.22 टक्के असणारा पाणीसाठा आज घडीला 24.98 टक्क्यांवर आला असून अवघ्या एका आठवड्यामध्ये तब्बल 1.22 टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. अर्धा पावसाळा संपला तरीही धरण रिकामंच असल्यानं राज्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांची चिंता वाढली आहे.  (हेही वाचा - Nashik Onion Market: कांदा लिलाव सलग तिसऱ्या दिवशीही बंदच, नाशिकमध्ये आंदोलन पेटले)

यावर्षी मराठवाडा विभागात उशिरा मान्सून दाखल झाल्याने 10 जूनऐवजी ‎25 जूनला मान्सूनचे आगमन झाले. गेल्या एक महिन्यांपासून बीड जिल्ह्यात पाऊस नाही. यामुळे जिल्ह्यातील धरणे कोरडे पडत आहेत. तर नद्या आजही ओस पडलेल्या आहेत. यामुळे पुढील काही दिवसात पाऊस पडला नाही; तर मोठं पाणी संकट बीड जिल्ह्यात निर्माण होण्याची शक्यता आहे.

पावसाने दडी मारल्यानं शेतकऱ्यांना फटका बसत असतांना, याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना देखील बसणार आहे. कारण अनेक प्रकल्पातील पाणी आटले असून, काही ठिकाणी अल्प पाणीसाठा शिल्लक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात जोरदार पाऊस न झाल्यास मराठवाड्यात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.