Maharashtra Assembly Winter Session: महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात 20 विधेयके मांडण्याचा सरकारचा विचार; CM Devendra Fadnavis यांची माहिती

राज्य विधानमंडळाच्या सन 2024 च्या चौथ्या अधिवेशनात 14 अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवून त्याचे विधेयकामध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. तसेच 6 नवीन विधेयके मांडण्यात येणार आहेत. एकूण 20 विधेयकांवर विचार करण्यात येणार आहे.

CM Devendra Fadnavis | X @ANI

Maharashtra Assembly Winter Session: महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण झाल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले की, महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात 20 विधेयके मांडण्याचा सरकारचा विचार आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान नागपुरात होणार आहे. रविवारी नागपूरच्या रामगिरी येथे पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आजपासून महाराष्ट्रात ‘डायनॅमिक गव्हर्नन्स’ सुरू झाल्याचे सांगितले. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मिशन समृद्ध महाराष्ट्र’ या सरकारच्या वचनबद्धतेची रूपरेषा सांगितली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यभर संतुलित विकासाचे आश्वासन दिले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हिवाळी अधिवेशन आहे आणि थंडी देखील आहे. त्यामुळे या अधिवेशनामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला ऊब मिळेल आणि ऊर्जा मिळेल, अशा प्रकारचा कारभार करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू. महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाला आणि विशेषतः विदर्भात अधिवेशन चालू असल्यामुळे विदर्भाच्या जनतेला देखील दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. या अधिवेशनामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा, पुरवणी मागण्यांवर चर्चा, सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा असे कामकाज होणार असून त्यासोबत जवळपास वीस विधयेके मांडण्यात येणार आहेत. हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार 20 विधेयके

राज्य विधानमंडळाच्या सन 2024 च्या चौथ्या अधिवेशनात 14 अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवून त्याचे विधेयकामध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. तसेच 6 नवीन विधेयके मांडण्यात येणार आहेत. एकूण 20 विधेयकांवर विचार करण्यात येणार आहे.

विधेयकात रूपांतरित होणारे अध्यादेश:

(१) सन २०२४ चे वि.स.वि.क्र… महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०२४ (नगर विकास विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. ५ चे रुपांतरीत विधेयक) अप्रत्यक्षपणे निवडलेल्या नगर पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचा पदावधी पाच वर्षे करणे,

(२) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध (सुधारणा) विधेयक, २०२४ (सामान्य प्रशासन विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. ६ चे रुपांतरीत विधेयक) (सर्वसाधारण बदलीसाठीच्या कालावधी ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याची तरतूद)

(३) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (नियमन) (सुधारणा, विधेयक, २०२४. (महसूल व वन विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. ७ चे रुपांतरीत विधेयक) (दंडाच्या कमाल मर्यादेत वाढ)

(४) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. हैद्राबाद इनामे व रोख अनुदाने रदद् करण्याबाबत (सुधारणा) विधेयक, २०२४ (महसूल व वन विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. ८ चे रुपांतरीत विधेयक) (अनधिकृत हस्तांतरण नियमित करणेबाबत)

(५) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अध्यादेश, २०२४ (वित्त विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. ९ चे रुपांतरीत विधेयक) (केंद्रीय अधिनियमाच्या अनुषंगाने सुसंगत सुधारणा करणे)

(६) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. … महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष (सुधारणा) विधेयक, २०२४ (पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. १० चे रुपांतरीत विधेयक) (अपराधांच्या शिक्षेत वाढ अधिनियमाच्या तरतुदीच्या उल्लंघनाबद्दल कडक शिक्षा व दंड वाढविण्याबाबत)

(७) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विवक्षित जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांच्या विषय समित्यांचे सभापती आणि विवक्षित पंचायत समित्यांचे सभापती व उप सभापती पदांच्या निवडणुका तात्पुरत्या ढकलणे विधेयक, २०२४ (ग्रामविकास विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. ११ चे रुपांतरीत वि (जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापती इत्यादी पदांच्या निवडणूका पुढे ढकलणे

(८) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा) विधेयक, २०२४ (महसूल व वनविभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. १२ चे रुपांतरीत विधेयक) (शासनाचा महसूल वाढविण्याच्या दृष्टीने अनुसूची एकच्या अनुच्छेदामध्ये सुधारणा करणेबाबत)

(९) सन २०२४ चे वि.प.वि.क्र… महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये (सुधारणा) विधेयक, २०२४ (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. १३ चे रुपांतरीत विधेयक) (वाचन संस्कृतीचा व ग्रंथालय चळवळीचा विकास करण्यासाठी अधिनियमाच्या विवक्षीत कलमांमध्ये सुधारणा करणेबाबत)

(१०) सन २०२४ चे वि.स.वि.क्र… महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत (सुधारणा) विधेयक, २०२४ (महसूल व वन विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. १४ चे रुपांतरीत विधेयक) (जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजनाचे नियमाधीकरण करण्यास परवानगी देणे आणि नियमाधीकरण अधिमुल्य कमी करुन बाजारमुल्याच्या ५ टक्के इतके निश्चित करणे)

(११) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिर विश्वस्तव्यवस्था (प्रभादेवी,

(सुधारणा) विधेयक, २०२४ (विधि व न्याय विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. १५ चे रुपांतरीत विधेयक) (विश्वस्थ समितीचा कार्यकाळ आणि समिती सदस्यांची संख्या वाढविणे)

(१२) सन २०२४ चे वि.प.वि.क्र… महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, २०२४ (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. १६ चे रुपांतरीत विधेयक) (समुह विद्यापीठ घटित करणेच्या तरतुदीमध्ये सुधारणा)

(१३) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा, विधेयक, २०२४( उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. १७ चे रुपांतरीत विधेयक) (नविन महाविद्यालय उघडण्यासाठी इरादापत्र मागविण्यासाठी कालावधी वाढवून देणेबाबत)

(१४) सन २०२४ चे वि.प.वि.क्र. .. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ दुसरी सुधारणा, विधेयक, २०२४ (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. १८ चे रुपांतरीत विधेयक) (हेही वाचा: Maharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात 6 राज्यमंत्री; पहा संपूर्ण यादी)

प्रस्तावित विधेयके:

(१) सन २०२४ चे वि.प.वि.क्र… महाराष्ट्र खाजगी विद्यापीठं दुसरी सुधारणा, विधेयक, २०२४ (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

(२) सन २०२४ चे वि.स.वि.क्र… महाराष्ट्र कारागृह व सुधारसेवा विधेयक, २०२४ (गृह विभाग)

(३) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. (महसूल विभाग) महाराष्ट्र जमिन महसूल संहिता (सुधारणा) विधेयक, २०२४

(४) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. हैदराबाद अतियात चौकशी (सुधारणा) विधेयक, २०२४ (महसूल विभाग)

(५) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. विधेयक, २०२४ (महसूल विभाग) महाराष्ट्र शेतजमीन (जमिन धारणेची कमाल मर्यादा) (सुधारणा)

(६) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन विधेयक, २०२४ (वित्त विभाग)

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now