Maharashtra Assembly Winter Session: 'कायद्याचं राज्य आहे, ते कायद्यानंच चालवा' अर्णब गोस्वामी, कंगना रनौत यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस आक्रमक

पाच वर्षे... 25 वर्षे..... अथवा 27 वर्षे चालवा. परंतू, ते कायद्याने चालवा. काही झाले तरी सत्ता डोक्यात जाता कामा नये, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारला लगावाला.

Kangana Ranaut, Devendra Fadnavis, Kangana Ranaut | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Winter Session 2020) दुसऱ्या दिवशी राज्य सरकार विरुद्ध विरोधी पक्ष असा जोरदार सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. विरोधीपक्ष नेते म्हणून बोलताना देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) हे काहीसे आक्रमक स्वरुपात पाहायला मिळाले. प्रामुख्याने रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांची अटक आणि कंगना रनौत (Kangana Ranaut) याच्या कार्यालयावर केलेल्या कारावाई प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. . 'खून करणाऱ्यास फाशी झालीच पाहिजे, चोरी करणाऱ्यास शिक्षा झालीच पाहिजे. पण हे पाकिस्तान नाही. इथं कायद्याचं राज्य आहे, ते कायद्यानंच चालवा,' असा टोलाही फडणीस यांनी कंगना आणि अर्णब प्रकरणावरुन राज्य सरकारला लगावला.

राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात देवेंद्र फडणीस विधानसभा सभागृहात मांडण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांवेळी (Discussion on Supplementary Demand) बोलत होते. या वेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रनौत यांनी जी काही वक्तव्ये केली आहेत. त्या वक्तव्यांबाबत आम्ही मुळीच सहमत नाही आहोत. त्याचा आम्ही निषेध करतो. परंतू, हे कायद्याचे राज्य आहे. त्यांच्यावर कायद्याने कारवाई करा, असे फडणवीस म्हणाले. (हेही वाचा, Maharashtra Assembly Winter Session: मराठा आरक्षण प्रश्नी चर्चा न झाल्याने विधानपरिषदेत भाजपा आमदारांचा सभात्याग; कामकाज तहकूब)

देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी एक आठवणही सांगीतली. ते म्हणाले एकदा मी अमेरिकेला गेलो होतो. तेव्हा अर्णब गोस्वामी यांनी माझ्यावरही मीडिया ट्रायल केली होती. तेथील काही गुंतवणूकदारांना मी भेटत होतो. यांचे कॅमेरे भलतेच काम करत होते. मात्र, तेव्हा मी त्यांना भारतात येऊन प्रत्युत्तर दिले. मी त्यांना अटक केली नाही. किंवा त्यांचे घरही तोडले नाही, असा टोलाही फडणवीस यांनी सरकारला लगावला. इथं कायद्याचं राज्य आहे, ते कायद्यानंच चालवा,' असे सांगायलाही फडणीस विसरले नाहीत.

दरम्यान, राज्य कारभार कितीही काळ चालवा. पाच वर्षे... 25 वर्षे..... अथवा 27 वर्षे चालवा. परंतू, ते कायद्याने चालवा. काही झाले तरी सत्ता डोक्यात जाता कामा नये, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारला लगावाला.