Maharashtra Assembly Winter Session 2022: हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळाच्या पायर्‍यांवर विरोधकांकडून 'राज्यपाल हटाव' ची घोषणाबाजी

राज्यपाल हटावची मागणी करताना विधिमंडळाच्या पायर्‍यांवर अजित पवार, अंबादास दानवे आदी आमदार होते.

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari | (Photo Credit: Facebook)

नागपूर (Nagpur) मध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Winter Session 2022) आजचा शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवसाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधक पुन्हा आक्रमक होताना दिसले. मागील काही दिवसांपासून सत्ताधारी आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (BS Koshyari) यांनी महापुरूषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा त्यांनी निषेध नोंदवला आहे. दरम्यान हात काळ्या टोप्या घेऊन आणि त्या भिरकावत विरोधक घोषणाबाजी करताना दिसले. यावेळी विरोधकांनी बॅनर हात धरत आणि बुजगावणी धरूनही घोषणाबाजी केली. 'राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाव' अशा घोषणा देताना आमदार दिसले.

राज्यपाल हटावची मागणी करताना विधिमंडळाच्या पायर्‍यांवर अजित पवार, अंबादास दानवे आदी आमदार होते. राज्यपालांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांचा सार्‍यांकडूनच यापूर्वी देखील निषेध नोंदवण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकार मधील पक्षांनी एकत्र येत मुंबईत राज्यपाल हटावच्या मागणीसाठी पदयात्रा काढली होती. आता आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काय होणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. नक्की वाचा: Winter Assembly Session: टाळ मृदुंगाच्या गजरात शिवसेना आमदार आदित्य ठाकरेसह विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, Watch Video .

हिवाळी अधिवेशनात अनेक गोष्टींवरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेले पहायला मिळाले होते. त्यानंतर झालेल्या गोंधळात एनसीपी प्रदेशाध्यक्ष आणि नेते जयंत पाटील यांच्यावर देखील कारवाई करत त्यांना या अधिवेशनासाठी असंसदीय शब्दाचा वापर केल्याचा ठपका ठेवत निलंबित केले आहे. आज संध्याकाळी सत्ताधारी आणि विरोधकांकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.