Maharashtra Assembly Polls 2024: लोकसभेत पराभव झाल्यानंतर पूजा खेडकरचे वडील Dilip Khedkar विधानसभेची निवडणूक लढवणार; उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निर्माण झाला नवा वाद
मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. दिलीप खेडकर आणि त्यांच्या पत्नी मनोरमा खेडकर हे कथित गुन्हेगारी धमकी प्रकरणातील आरोपी आहेत. जून 2023 मध्ये जमिनीच्या वादातून मनोरमा यांनी पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला बंदूक दाखवली होती.
Maharashtra Assembly Polls 2024: माजी बडतर्फ आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर (Puja Khedkar) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचे वडील दिलीप खेडकर (Dilip Khedkar) हे अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी नुकताच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याआधी दिलीप खेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत अपयशी ठरल्यानंतर आता ते महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. दिलीप खेडकर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. यावेळी त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात पत्नीशी संबंधित कोणतीही माहिती दिलेली नाही. याआधी लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी ही माहिती दिली होती.
विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. दिलीप खेडकर आणि त्यांच्या पत्नी मनोरमा खेडकर हे कथित गुन्हेगारी धमकी प्रकरणातील आरोपी आहेत. जून 2023 मध्ये जमिनीच्या वादातून मनोरमा यांनी पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला बंदूक दाखवली होती.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दिलीप यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात पत्नी मनोरमा यांच्याविषयी तपशील नमूद करून, ते वेगळे झाले नसल्याचे सूचित केले होते, तर त्यांची मुलगी पूजा खेडकरने विभक्त झाल्याचा दावा केला होता. यावेळी दिलीप यांनी 'लाइफ पार्टनर' भागात पत्नीची माहिती दिली नाही. लोकसभेवेळी त्यांनी अनेक संयुक्त मालमत्तांचा तपशीलही दिला होता. तसेच त्यांचे कुटुंब आजही संयुक्त कुटुंब असल्याचे सांगितले. दिलीप खेडकर यांनी अहमदनगर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता. (हेही वाचा: Suraj Chavan Supports Ajit Pawar: 'अजित दादांना झापूक झुपूक मतदान करा'; Bigg Boss Marathi 5 विजेता सूरज चव्हाण चं बारामती मध्ये जाहीर सभेत आवाहन)
अहवालानुसार, दिलीप आणि मनोरमा खेडकर यांनी 2009 मध्येच पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटाची याचिका दाखल केल्याचे नुकत्याच उघड झालेल्या कागदपत्रांवरून दिसून येते. न्यायालयाने 25 जून 2010 रोजीच घटस्फोटाचे आदेश दिले होते. मिळालेल्या माहितीनुसार, घटस्फोटानंतरही दोघेही एकाच बंगल्यात राहत होते. मनोरमा खेडकर यांच्या नावावर हा बंगला आहे. पूजा खेडकरला आरक्षणाचा लाभ चुकीच्या पद्धतीने घेतल्याबद्दल युपीएससीने निलंबित केले होते.