Maharashtra Assembly Elections: राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात समन्वयक म्हणून Anil Mahajan यांची नियुक्ती

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार, श्री.गुलाबराव आप्पा देवकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ आधिकृत समन्वयक म्हणून पक्षाचे प्रदेश संघटक-सचिव श्री.अनिलभाऊ महाजन यांची निवड करण्यात आली आहे.

Anil Mahajan (File Image)

Maharashtra Assembly Elections: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात समन्वयक म्हणून अनिल भाऊ महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार, श्री.गुलाबराव आप्पा देवकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ आधिकृत समन्वयक म्हणून पक्षाचे प्रदेश संघटक-सचिव श्री.अनिलभाऊ महाजन यांची निवड करण्यात आली आहे. उमेदवार श्री.गुलाबराव आप्पा देवकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ दैनंदिन सर्व कामकाजामध्ये लक्ष घालणे व त्याचप्रमाणे प्रदेश कार्यालयाशी संपर्क साधून दैनंदिन घडामोडीचा अहवाल द्यावा, असे आदेश पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. जयंतराव पाटील यांनी दिले आहेत. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांनी सहीनशी नियुक्तीपत्र दिनांक 5 नोव्हेंबर 2024 रोजी मीडियाला प्रसिद्ध केले आहे. (हेही वाचा: Maharashtra Assembly Elections: जाणून घ्या निवडणूक काळात राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी ‘काय करावे’आणि ‘काय करू नये’; नियमांचे उल्लंघन झाल्यास नागरिक C-Vigil App वर करू शकतात तक्रार)

गुलाबराव देवकर हे जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- एसपीशी संबंधित मोठे राजकारणी आहेत. ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आणि महाराष्ट्र राज्याचे नागरी वाहतूक मंत्री होते. दुसरीकडे, याआधी जळगाव जिल्ह्यातील एरंडोल विधानसभा (Erandol Assembly Constituency) मतदारसंघातून NCP-SP पक्षाकडून आपणास उमेदवारी मिळवी. तसेच, पक्षाचे विद्यमान आमदार आणि नेते एकनाथ खडसे यांनी मनावर घेतले तर आपण सहज विजयी होऊ, असा विश्वास बहुजन नेते अनिल महाजन यांनी व्यक्त केला होता.