Maharashtra Assembly Elections 2024: पुण्यात ट्रान्सजेंडर गट 'शिखंडी ट्रस्ट'चा मतदानावर बहिष्कार, जाणून घ्या कारण

जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातून शमीभा पाटील या एकमेव ट्रान्सजेंडर उमेदवार आहेत.

(File Image)

Maharashtra Assembly Elections 2024: पुण्यातील (Pune) शिखंडी ट्रस्ट (Shikhandi Trust) या ट्रान्सजेंडर ग्रुपने त्यांच्या मागण्या मान्य न केल्याच्या निषेधार्थ, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. शिखंडी ट्रस्टच्या संस्थापक मानसी गोयलकर म्हणाल्या, ‘आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकत आहोत, कारण ट्रान्सजेंडर समुदाय अजूनही कायदेशीर आणि सामाजिक आव्हानांना तोंड देत आहे. या राजकारण्यांना आमचे अस्तित्व फारसे महत्त्वाचे नाही. इतक्या वर्षांत कोणत्याही राजकीय पक्षाने आमच्यासाठी काही केले आहे का? कोणत्याही राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यात आमच्या गरजा आणि मागण्यांचा समावेश केलेला नाही.’

त्या पुढे म्हणाल्या, ‘आम्ही आमच्या हक्कांसाठी लढत आहोत आणि आम्हाला आरक्षण हवे आहे, जेणेकरून आम्ही देखील मुख्य प्रवाहात येऊ शकू. आम्हाला आमच्या समुदायाला सशक्त बनवायचे आहे, त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात नोकऱ्या मिळवून देण्यास मदत करायची आहे. याद्वारे ट्रान्सजेंडर केवळ पैसे मागतात हा लोकांचा समाज दूर करायचा आहे.’

गोयलकर यांनी नमूद केले की संपूर्ण राज्यात केवळ वंचित बहुजन आघाडीने (VBA) ट्रान्सजेंडर उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातून शमीभा पाटील या एकमेव ट्रान्सजेंडर उमेदवार आहेत. याआधी 2011 मध्ये, भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) ट्रान्सजेंडर व्यक्तींना स्वतंत्र गट म्हणून निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला,  तेव्हापासून हा समाज प्रवर्गातील 'इतर' म्हणून मतदानाचा हक्क बजावत आहे. तृतीयपंथीयांबद्दल नागरिकांना संवेदनशील करूनही, तृतीयपंथी लोकांना आपला समाजाचा समावेश झाल्याचे वाटत नाही. (हेही वाचा: Supriya Sule on Bitcoin Scam: बिटकॉईन खरेदी विक्री प्रकरण; सुप्रिया सुळे यांचे विरोधकांना आव्हान; शरद पवार यांच्याकडून पाठराखण; Ajit Pawar म्हणाले आवाज परिचयाचा)

दरम्यान, पुणे जिल्ह्यात एकूण 805 ट्रान्सजेंडर मतदार आहेत. मात्र, अनेकांनी त्यांची नावे नोंदवली नसल्यामुळे ही संख्या 10,000 पेक्षा जास्त असू शकते. राज्यात एकूण 6,101 तृतीयपंथी मतदार असून मतदारसंख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे. दुसरीकडे, दुपारी 3  वाजेपर्यंत राज्यात 45.53 टक्के मतदान झाले असून, गडचिरोली येथे सर्वाधिक 62.99 टक्के तर ठाण्यात सर्वात कमी 38.94 टक्के मतदान झाले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif