Maharashtra Assembly Elections 2024: एकनाथ शिंदे गटाची उमेदवारी यादी जाहीर; अमित ठाकरे विरूद्ध माहिम मध्ये सदा सरवणकरांना तिकीट; पहा 45 उमेदवारांची संपूर्ण यादी
एकनाथ शिंदेंसाठी ही पक्षातील बंडानंतर पहिली निवडणूक असल्याने कमालीची अटीतटीची आहे.
Shiv Sena Candidate List For Assembly Election: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचं धुमशान आता सुरू झालं आहे. रात्री उशिरा मनसे (MNS) पाठोपाठ एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही शिवसेना (Shiv Sena) पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. स्वतः एकनाथ शिंदे कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूकीला उतरणार आहेत तर माहिम-दादर या मुंबई मधील महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघात सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांना तिकीट देण्यात आले आहे. दरम्यान याच मतदारसंघातून मनसे कडून राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) निवडणूकीच्या रिंगणात आहेत. ही अमित ठाकरेंची पहिलीच निवडणूक आहे.
दरम्यान एकनाथ शिंदेंनी जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये त्यांच्यासोबत बंडात सहभागी शिलेदारांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. संदिपान भुमरेंच्या जागी त्यांचा लेक विलास संदिपान भुमरे यांना तिकीट देण्यात आले आहे. तर मुंबई मध्ये जोगेश्वरी पूर्व मध्ये रविंद्र वायकरांच्या पत्नी मनिषा वायकर यांना तिकीट देण्यात आले आहे. तसेच सामंत बंधूंनाही तिकीट जाहीर झाले आहे. रत्नागिरीतून उदय सामंत आणि राजापूर मधून किरण सामंत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पहिल्या यादीतील 45 उमेदवार
लोकसभेला महायुती साठी राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता विधानसभेसाठी राज ठाकरे स्वबळावर लढणार आहेत. पण अमित ठाकरेंसाठी आता पहिल्याच निवडणूकीसाठी शिवसेना त्यांच्या उमेदवारामध्ये काही बदल करणार का? हे पहावं लागेल. दरम्यान सदा सरवणकर हे जुने शिवसैनिक आहेत. शिवसेना त्यानंतर ते कॉंग्रेस आणि पुन्हा शिवसेना असा प्रवास करून आलेले आहेत. सध्या त्यांच्याकडे सिद्दिविनायक मंदिरातील न्यासाचे अध्यक्षपद आहे. सदा सरवणकर 3 वेळेस विधानसभेत निवडून गेले आहेत. दादर हा भाग शिवसैनिकांसाठी महत्त्वाचा आहे. राज ठाकरे यांचे निवासस्थान देखील हेच असल्याने मनसे देखील या भागात मोठी ताकद लावण्याच्या तयारी मध्ये आहे. यापूर्वी 2009 मध्ये मनसे कडून नितीन सरदेसाई माहिम मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत.