Maharashtra Assembly Elections 2019: वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर

याच पार्श्वभुमीवर वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून विधानसभा निवडणूकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाकडून 22 उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे.

प्रकाश आंबेडकर (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

आगामी विधानसभा निवडणूकीसाठी (Assembly Elections) तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठी रणनिती ठरवली जात असल्याचे चित्र सध्या दिसून येते आहे. मात्र एमआयएम (MIM) आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) यांमधील वाद सुरु असल्याचा प्रकार दुसऱ्या बाजूला पहायला मिळत आहे. याच पार्श्वभुमीवर वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून विधानसभा निवडणूकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाकडून 22 उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे.

लोकसभा निवडणूकीसाठी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र विधानसभा निवडणूकीसाठी या दोन्ही पक्षात जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरुन वाद सुरु असल्याने दोघांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्याचसोबत उमेदवारांचा नावांपुढे जातीसुद्धा उल्लेख करण्यात आला आहे.(Maharashtra Assembly Elections 2019: MIM पक्षाकडून उमेदवारी यादी जाहीर, वंचित आघाडी बाबत प्रश्नचिन्हा कायम)

वंचित बहुजन आघाडी उमेदवार यादी

तर दुसऱ्या बाजूला एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी मालेगाव, नांदेड व वडगावशेरी या मतदारसंघातील उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. मालेगाव मध्य संघातून मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलीक, पुणे वडगावशेरी येथून डॅनियल लांडगे व नांदेड उत्तर येथून मोहम्मद फिरोज खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच तर सोलापूर सांगोला मतदारसंघातून एमआयएमकडून अॅड शंकर भगवान सरगर, सोलापूर मध्य मधून फारुक मकबूली शब्दी, सोलापूर दक्षिण येथून सुफिया तौफिया शेख आणि पुणे कंन्टोंमेट येथून हीना शफिक मोमीन यांना उमेदवारी देण्यात आली आहे