महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 ऑक्टोंबरला पुणे-सातारा दौऱ्यावर, निवडणूकीपूर्वी राज्यात 9 सभा घेणार

तसेच नरेंद्र मोदी राज्यात 9 सभा घेणार आहेत.

PM Narendra Modi (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Elections) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली असून आता राज्यातील विविध ठिकाणी प्रचारसभा घेतल्या जात आहेत. येत्या 17 ऑक्टोंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) महाराष्ट्रातील पुणे (Pune) आणि सातारा (Satara) येथे दौऱ्यावर येणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नरेंद्र मोदी राज्यात 9 सभा घेणार आहेत.

भाजपचे कार्यकर्ते नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेसाठी फार उत्सुक आहेत. तर मोदी यांच्या एकूण 9 प्रचारसभेपैकी दोन सभा पश्चिम महाराष्ट्रात होणार आहे. तर पुणे आणि सातारा येथील सभा एकाच दिवशी पार पडणार आहेत. परंतु पुणे येथे कोणत्या ठिकाणी मोदी कार्यकर्त्यांना संबोधणार हे अद्याप ठरलेले नाही. तसेच हरियाणा येथे सुद्धा येत्या 21 ऑक्टोंबरला विधानसभा निवडणूक पार पडणार आहेत. राज्यातील कोणत्या अन्य ठिकाणी मोदी यांच्या सभा पार पडणार हे लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे ही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. त्याचसोबत अमित शहा राज्यभरात 18 सभा निवडणूकीपूर्वी घेणार आहेत.(Maharashtra Assembly Election 2019: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 'हे' असतील भाजपचे स्टार प्रचारक; पहा यादी)

भाजपने तोडफोडीचे राजकारण करत लोकसभेप्रमाणही निवडणूकही मोठ्या उंचीवर नेवून ठेवली आहे. त्यामुळे महायुतीसोबतच विरोधी पक्षानेत्यांसाठीही ही निवडणूक फार महत्वाची ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने प्रचाराचा धुरळा उडवण्यासाठी थेट पीएम नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची मदत घ्यायची ठरवली आहे. यांच्यासह केंद्रातील जगत प्रकाश नद्डा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, स्मृती इराणी, पियुष गोयल, यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. मोदी-शहा यांच्या सभा काही महत्वाच्या नेत्यांच्या मतदारसंघात होणार आहेत. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, गिरीश महाजन, उदयनराजे भोसले यांचा समावेश आहे.