Maharashtra Assembly Elections 2019: 21ऑक्टोबर दिवशी 9000 हुन अधिक मतदान केंद्रावर होणार LIVE Webcasting; निवडणूक आयोगाचा निर्णय

याच अंतर्गत राज्यात सुरक्षेच्या कारणास्तव महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने तब्ब्ल 9,673 मतदान केंद्रावरून लाईव्ह वेबकास्टिंग (Live Webcasting) करण्याचे योजले आहे.

Image For Representation (Photo Credit: Pexels)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Elections 2019) मतदान पुढील आठवड्यात म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. तत्पूर्वी राज्यात सुरक्षेच्या कारणास्तव अनेक बंदोबस्त करण्यात येत आहेत. याचअंतर्गत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने तब्ब्ल 9,673 मतदान केंद्रावरून लाईव्ह वेबकास्टिंग (Live Webcasting) करण्याचे योजले आहे. यामध्ये अतिसंवेदनशील ठिकाणांचा देखील समावेश आहे. याबाबत आज, 14 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोग (Election Commission) कर्मचाऱ्यांकडून रीतसर माहिती देण्यात आली आहे. संबंधित मतदान केंद्रावरील थेट प्रक्षेपण आयोगाच्या देखरेखीखाली असल्याने याठिकणी कोणतेही गैरप्रकार होणार नाहीत याची खात्री करणे सहज होऊ शकते.

प्राप्त माहितीनुसार, 21 ऑक्टोबर दिवशी राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे, यासाठी 96,661 मतदान केंद्रावर जोरदार तयारी सुरु आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे मतदानाच्या दोन दिवस आधी म्हणजेच 19 व 20 ऑक्टोबर रोजी तसेच मतदानाच्या आणि निकालाच्या दिवशी म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी राज्यात मद्यविक्री बंद असणार आहे. यामुळे राजकीय पक्षांचे अतिउत्साही कार्यकर्ते आणि त्यांच्यामुळे होणारा ढांगांधिंगा यावर रोख बसेल अशी अपेक्षा आहे.

नागपूर: मतदानाचा हक्क बजवा आणि पेंच मध्ये MTDC रिसॉर्ट, हॉटेल्समध्ये 25 टक्के सूट मिळवा!

दरम्यान, यंदा पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीसाठी VVPAT मशिनचा वापर करण्यात येणार आहे याकरिता 1,35,021 VVPAT मशिन्स, तसेच 1,79,895 बॅलेट युनिट्स आणि 1,26,505 कॅन्ट्रोल यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत.



संबंधित बातम्या