IPL Auction 2025 Live

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या निकालापूर्वी भाजपचा उत्साह शिगेला, विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी 5 हजार लाडूंचे वाटप

त्यानंतर आता उद्या या निवडणूकीचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी मतदानानंतर विविध प्रसार माध्यमांनी यंदाच्या निवडणूकीच्या निकालाचे एक्झिट पोल जाहीर केले. त्यानुसार पुन्हा एकदा भाजप-शिवसेना युतीची सत्ता येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि चंद्रकांत पाटील (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी 288 जागांवर मतदान पार पडले. त्यानंतर आता उद्या या निवडणूकीचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी मतदानानंतर विविध प्रसार माध्यमांनी यंदाच्या निवडणूकीच्या निकालाचे एक्झिट पोल जाहीर केले. त्यानुसार पुन्हा एकदा भाजप-शिवसेना युतीची सत्ता येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार एक्झिट पोलचा दावा खरा ठरणार की खोटा हे उद्याच स्पष्ट होणार आहे. मात्र भाजपने आपलाच विजय होणार असल्याचे आधीच ठरवले आहे. त्यामुळे उद्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी तब्बल 5 हजार लाडूंचे वाटप भाजपकडून करण्यात येणार आहे.

भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच कार्यालयाबाहेर निवडणूकीचे निकाल पाहता येण्यासाठी मोठी स्क्रिन सुद्धा लावण्यात आली आहे. तर सकाळी 10 वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांना या निवडणूकीच्या निकालाचा आनंद साजरा करण्यासाठी बोलावण्यात आले आहे. त्याचसोबत संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच्या कार्यालयात उपस्थित राहून निकालाबाबत बोलणार आहेत.तसेच भाजपाचा आनंदत्सोव साजरा करण्यासाठी नरिमन पॉइंट येथील फुटपाथ आणि परिसरात मंडपासह व्यासपीठ उभारणीसाठी परवानगी देण्याची विनंती महापालिकेकडे करण्यात आली आहे. (शरद पवार यांच्या सभांमुळे शिवसेना पक्षासमोर चिंता? राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चुकवणार सेनेच्या बाणाचा नेम?)

दरम्यान, विधानसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रात 288 जागांवर भाजपने 164 जागा आणि शिवसेनेने 288 जागांवर निवडणूक लढवली. तर उर्वरित जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात आल्या होत्या. दुसऱ्या बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांनी अमुक्रमे 147-124 जागांवर निवडणूक लढवली. मात्र आता उद्या निवडणूकीचे निकाल सष्ट होणार असून कोणाची सत्ता महाराष्ट्रात प्रस्थापित होणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.