विधानसभा निवडणूकीत होणाऱ्या काळ्या पैशांच्या व्यवहारावर आयकर विभाग करडी नजर ठेवणार
तसेच 24 ऑक्टोंबरला निवडणूकीचा निकाल दिला जाणार आहे. मात्र निवडणूकीच्या काळात मोठ्या प्रमाणात काळ्या पैशांचा व्यवहार केला जात असल्याच्या घटना यापूर्वी उघडकीस आल्या आहेत.
विधानसभा निवडणूक (Assembly Elections) येत्या 21 ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र (Maharashtra) आणि हरियाणा (Haryana) येथे पहिल्याच टप्प्यात निवडणूक होणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच 24 ऑक्टोंबरला निवडणूकीचा निकाल दिला जाणार आहे. मात्र निवडणूकीच्या काळात मोठ्या प्रमाणात काळ्या पैशांचा व्यवहार केला जात असल्याच्या घटना यापूर्वी उघडकीस आल्या आहेत. तर यंदा सुद्धा विधानसभा निवडणूकीदरम्यान काळ्या पैशांच्या व्यवहारावर आयकर विभागाची करडी नजर राहणार आहे.
आयकर विभागाने निवडणूकीदरम्यान होणारी देवाण-घेवाण, पैसे, सोने, चांदी वाटप या प्रकारावर आळा घालण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. त्यामुळे आयकर विभागाकडून काळ्या पैशांबाबत अधिक माहिती देण्यासाठी व्हॉट्सअॅप मेसेज आणि क्रमांक जाहीर केले असून त्याच्या वापर करता येणार आहे. तर व्हॉट्सअॅपच्या या क्रमांकावर काळ्या पैशांच्या व्यवहाराबाबत अधिक माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.(विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या पहिल्याच दिवशी 66 लाख रुपयांची रोकड हस्तगत; मुंबई पोलिसांची कारवाई)
तर पुणे आणि नागपूर या दोन शहारत अहोरात्र नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार असून त्यांच्याकडे काळ्या पैशांच्या व्यवहाराबाबत अधिक माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. तर पुणे येथील तक्रारीबाबत माहिती देण्यासाठी व्हॉट्सअॅप 7498978898 या क्रमांक आणि नागपूरसाठी 9403391664 या क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले आहे.
दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि आचारसंहितेची घोषणा केल्यावर पहिल्याच दिवशी मुंबई पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली. तर भुलेश्वर परिसरात ही कारवाई करण्यात आली असून 66 लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.