Maharashtra Assembly Elections 2019: अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर स्वतःची, तर शिंदे, पाटील-निलंगेकर, राणे या माजी मुख्यमंत्र्यांवर मुलांची जबाबदारी; जनता देणार का साथ?
लोकसभेमध्ये हात पोळल्यावर विधानसभेमध्ये कोणतीही गडबड होऊ नये म्हणून, आता राज्यातील प्रत्येक पक्ष तोलून मापून पावले टाकत आहे. यामुळेच राज्यातील 5 माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे दिसून येते.
विधानसभेचे (Maharashtra Assembly Election), बिगुल वाजले आहे, युतीचा फॉर्मुला सेट झाला आहे, उमेदवारांच्या याद्याही जाहीर झाल्या आहेत. आता प्रतीक्षा ती प्रचार, निवडणूक आणि मतमोजणीची. लोकसभेमध्ये भाजप-शिवसना युतीने घवघवीत यश प्राप्त केल्यावर, आता विधानसभेसाठी दोन्ही पक्षांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. लोकसभेमध्ये हात पोळल्यावर विधानसभेमध्ये कोणतीही गडबड होऊ नये म्हणून, आता राज्यातील प्रत्येक पक्ष तोलून मापून पावले टाकत आहे. यामुळेच राज्यातील 5 माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे दिसून येते.
सुशीलकुमार शिंदे, शिवाजीराव पाटील-निलंगेकर, नारायण राणे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण अशा पाच माजी मुख्यमंत्र्यांवर या विधानसभेसाठी फार मोठी जबाबदारी असणार आहे.
> लोकसभेमध्ये सोलापूर येथून सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला. आता विधानसभेसाठी कॉंग्रेसने शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना उमेदवारी दिली आहे. इथे प्रणिती यांना एमआयएम, माकप आणि शिवसेनेचे कडवे आव्हान असणार आहे. सोलापूरमध्ये कॉंग्रेसला पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी प्रणिती शिंदे यांचा विजय फार महत्वाचा आहे
> कॉंग्रेसने अजून एका ठिकाणी माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला उमेदवारी दिली आहे. निलंगा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे चिरंजीव अशोकराव पाटील-निलंगेकर (Shivajirao Patil Nilangekar) निवडणूक लढवत आहे. त्यांच्या विरीधात भाजपने संभाजीराव पाटील-निलंगेकर यांना उभे केले आहे. अशा प्रकारे निलंगा मतदार संघात मोठे गृहयुद्ध दिसून येत आहे. मागच्या निवडणुकीतील पराभवामुळे यावेळी शिवाजीराव यांना आपल्या मुलाला जिंकवणे गरजेचे आहे. (हेही वाचा: महाराष्ट्राच्या हितासाठी तडजोड केली! पण, शिवसेना एकटी कधीही लढू शकते; उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा)
> कोकणात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) भाजपकडून निवडणूक लढवत आहे. शिवसेनेला धूळ चारण्यासाठी नितेश राणे यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे, तशीच ती नारायण राणे यांच्यासाठीही महत्वाची आहे.
> माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण (Ashok Chavan) यांचा लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर, आता पुन्हा एकदा कॉंग्रेसने नांदेड जिल्ह्यातील भोकर येथून त्यांना उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. भोकर विधानसभा मतदार संघासाठी तब्बल 134 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
> सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण ही जागा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून इथे कॉंग्रेसचा पराभव झाला नाही. आतापर्यंत झालेल्या 13 विधानसभा निवडणुका या पक्षाने जिंकल्या आहेत. या मतदारसंघातून कॉंग्रेसने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना उमेदवारी दिली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)