पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद मलाच मिळणार, देवेंद्र फडणवीस यांचा दावा
तर 21 ऑक्टोंबरला महाराष्ट्र (Maharashtra) आणि हरियाणा (Haryana) येथे निवडणूका पहिल्याच टप्प्यात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तत्पूर्वी राजकीय पक्षांकडून कोण जिंकणार याबाबत दावा केला जात आहे.
आगामी विधानसभा निवडणूकीसाठी (Assembly Elections) तारखा आज (21 सप्टेंबर) जाहीर करण्यात आल्या. तर 21 ऑक्टोंबरला महाराष्ट्र (Maharashtra) आणि हरियाणा (Haryana) येथे निवडणूका पहिल्याच टप्प्यात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तत्पूर्वी राजकीय पक्षांकडून कोण जिंकणार याबाबत दावा केला जात आहे. याच पार्श्वभुमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी त्यांना पुन्हा एकदा मुख्यंमंत्री पदाची कमान सांभाळायला मिळेल असा दावा केला आहे. त्याचसोबत शिवसेनेसोबत मतभेद असले तरीही आम्ही निवडणूक एकत्रच लढणार आहोत असे ही म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेसाठी राखीव ठेवावी अशी मागणी करण्यात आली असल्याचे ही फडणवीस यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात शिवसेनेला समांतर जागा देण्यात याव्यात यावर भाजपसोबत ते अडून बसले होते. मात्र शिवसेनेला भाजपकडून 126 जागा देण्यात येणार असल्याच्या निर्णयावर राजी झाल्याचे बोलले जात आहे. सूत्रांच्या मते भाजपला 162 जागा मिळू शकतात. तर अन्य मित्रपक्षांना उर्वरित जागा देण्याची शक्यता आहे. परंतु दुसऱ्या बाजूला काँग्रेस भाजपला या निवडणूकीत हरवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काँग्रेस प्रवक्ता पवन खेडा यांनी असे म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त आहेत. शेतकरी आत्महत्या सुद्धा करत असल्याची स्थिती आहे. एवढेच नसून सरकार कधी बदलणार याची वाट पाहत असल्याचे खेडा यांनी सांगितले आहे.(Assembly Election 2019: दिवाळी आधीच युतीची दिवाळी; निवडणुकीची घोषणा होताच शिवसेना नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया)
त्याचसोबत शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद भाजप कडून देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. तसेच शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सुद्धा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे. यावर फडणवीस यांनी आदित्या ठाकरे यांचे राजकरणात स्वागत केले असून शिवसेनेसाठी ही चांगली गोष्ट आहे. तसेच भाजप-शिवसेना युतीचा अधिकृत जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे ही फडणवीस यांनी म्हटले आहे.