Maharashtra Assembly Election 2024 Party Wise Results: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत BJP ठरला 132 जागांसह सर्वात मोठा पक्ष; जाणून घ्या पक्षनिहाय जागा
मतांच्या संख्येतही राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे त्यांचे काका शरद पवार यांच्या पक्षापेक्षा मागे आहेत.
Maharashtra Assembly Election 2024 Party Wise Results: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी (23 नोव्हेंबर) जाहीर झाले. या निवडणुकीत महायुतीने चमकदार कामगिरी करत आपली सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. त्याचवेळी या आघाडीत भाजपची कामगिरी उत्कृष्ट होती. पक्षाने 2014 चा विक्रम मोडला आहे. पक्षाला 132 जागांवर यश मिळाले आहे. येथील विधानसभा निवडणुकीत जागा जिंकत भाजपने तिसऱ्यांदा शतक झळकावले आहे. 2014 मध्ये भाजपने 122 जागा जिंकल्या होत्या, तर 2019 मध्ये पक्षाने 105 जागा जिंकल्या होत्या.
अजित पवार यांनी 41 जागा जिंकल्या आणि त्यांची मतांची टक्केवारी 9.01 टक्के होती, तर शरद पवार गटाला फक्त 10 जागा मिळाल्या, परंतु त्यांचा मतांचा वाटा 11.28 टक्के होता.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 जागा मिळाल्या आणि त्यांना 12.38 टक्के मताधिक्य मिळाले, तर काँग्रेसला केवळ 16 जागा जिंकता आल्या, परंतु पक्षाची मते 12.42 टक्के होती. (हेही वाचा: Maharashtra Election Result 2024 Winners List: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या विजयी उमेदवारांची यादी)
कोणत्या पक्षाला किती मतदान झाले?
भाजप- 26.77 टक्के
काँग्रेस- 12.42 टक्के
राष्ट्रवादीचे शरद पवार गट - 11.28 टक्के
राष्ट्रवादी अजित पवार गट - 9.01 टक्के
शिवसेना शिंदे गट - 12.38 टक्के
शिवसेना उद्धव गट – 9.96 टक्के
AIMIM- 0.85 टक्के
मनसे- 1.55 टक्के
महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा?
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. मात्र अवघ्या 172 दिवसांत राज्यातील राजकीय वातावरण बदलले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा चमत्कार केला. त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांनीही चांगली कामगिरी केली. 288 पैकी भाजपने 132 तर शिवसेनेने 57 जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या आहेत.
महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?
महाविकास आघाडीत काँग्रेसने 16 जागा जिंकल्या. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने (UBT) 20 जागा जिंकल्या. तर शरद पवार यांच्या पक्षाला केवळ 10 जागांवर समाधान मानावे लागले. समाजवादी पक्षाने 2 जागा जिंकल्या. एआयएमआयएमलाही एक जागा मिळाली आहे.
पक्षनिहाय जागा-
Bharatiya Janata Party - BJP | 132 | 0 | 132 |
Shiv Sena - SHS | 57 | 0 | 57 |
Nationalist Congress Party - NCP | 41 | 0 | 41 |
Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) - SHSUBT | 20 | 0 | 20 |
Indian National Congress - INC | 16 | 0 | 16 |
Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar - NCPSP | 10 | 0 | 10 |
Samajwadi Party - SP | 2 | 0 | 2 |
Jan Surajya Shakti - JSS | 2 | 0 | 2 |
Rashtriya Yuva Swabhiman Party - RSHYVSWBHM | 1 | 0 | 1 |
Rashtriya Samaj Paksha - RSPS | 1 | 0 | 1 |
All India Majlis-E-Ittehadul Muslimeen - AIMIM | 1 | 0 | 1 |
Communist Party of India (Marxist) - CPI(M) | 1 | 0 | 1 |
Peasants And Workers Party of India - PWPI | 1 | 0 | 1 |
Rajarshi Shahu Vikas Aghadi - RSVA | 1 | 0 | 1 |
Independent - IND | 2 | 0 | 2 |
Total | 288 | 0 | 288 |
---|